Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याणराव आखाडे यांना विधान परिषदेची संधी द्यावी. डॉ. राजीव काळे

सुपा : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकी

मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
निळवंडेचे खुले कालवे व चार्‍या लाभक्षेत्रासाठी वरदान ः विलास गुळवे
टिचभर राजकीय उंची नसणाऱ्यांनी आ. रोहित पवारांची बरोबरी करु नये 

सुपा : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणुन महायुतीच्या बाजुने अत्यंत निष्ठेने भूमिका निभावली. राज्यात झालेल्या विधानसभेच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यामध्ये सावता परिषदेची मोलाची मदत झालेली आहे. कल्याणराव आखाडे या नेतृत्वाला न्याय म्हणुन त्यांना विधान परिषद सदस्य म्हणुन संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ.राजीव काळे यांनी केली आहे.
कल्याणराव आखाडे यांचा दांडगा जनसंपर्क व क्रीयाशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा परिचय सावता परिषदेने महाराष्ट्राला दिलेला आहे.अमोघ वक्तृत्वाने त्यांनी समाजात जागर केला. सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील माळी समाज जोडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. पक्षवाढीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत सर्वांना ज्ञात आहे. नुक्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक राहिली. राज्यात सावता परिषदेला मानणारा माळी समाजाची मते महायुतीच्या पारड्यात मिळाली.अनेक मतदार संघात सावता परिषदेचा निर्णायक प्रभाव आहे.कल्याणराव आखाडे यांनी अनेक मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या. घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळालेले आहे. एक निष्ठावंत, प्रमाणिक व क्रीयाशील नव्या चेहर्‍याला विधीमंडळाच्या विधान परिषदेची संधी मिळावी ही माळी समाजासह अनेकांची अपेक्षा आहे. अजितदादा कल्याणराव आखाडे या नेतृत्वाला न्याय देतील असा विश्‍वास सावता परिषदेच्या पदाधिकार्‍यांना आहे. विधानपरिषद सदस्य म्हणून या निवडणुकीत अनेकजण विधान सभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. यामध्ये पाथरी विधानसभेत राजेश विटेकर यांचा विजय झालेला आहे. त्यांच्या होणार्‍या विधान परिषदेच्या रिक्त जागी कल्याणराव आखाडे यांना संधी द्यावी. विधानपरिषदेची संधी देऊन आगामी काळात काम करण्यास बळ मिळेल अशी अपेक्षा अजितदादा पवार यांच्याकडे सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे व अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुदाम मामा लोंढे, उपाध्यक्ष रोहित मेमाणे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS