Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळम्मादेवी देवस्थानास राज्य शासनाकडून तिर्थस्थानचा ब वर्ग दर्जा प्राप्त : देवराज पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : काळमवाडी (ता. वाळवा) येथील सुप्रसिध्द काळम्मादेवी देवस्थानला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने तिर्थस्थानचा ब व

भाषा-संस्कृतीचे महत्व पालकांमध्ये रुजणे गरजेचे : प्रा. वैजनाथ महाजन
तोतया पोलिसांच्या कारनाम्याचा पर्दाफाश; दुचाकीसह दोघे अटकेत
शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे

इस्लामपूर / प्रतिनिधी : काळमवाडी (ता. वाळवा) येथील सुप्रसिध्द काळम्मादेवी देवस्थानला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने तिर्थस्थानचा ब वर्ग दर्जा देण्यात आला आहे. काळमवाडी ग्रामस्थ व काळम्मादेवी भक्तांची बर्‍याच दिवसापासूनची मागणी होती. जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला होता. याकामी राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ना. हसन मुश्रीफ, शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली.
काळमवाडी (ता. वाळवा) येथील सुप्रसिध्द काळम्मादेवी देवस्थानला तिर्थस्थानला यापूर्वी क वर्ग दर्जा देण्यात आला होता. शासनाने याबाबत पाहणी करून त्यात सुधारणा करत ब वर्ग दर्जा देण्यात आला. यामुळे राज्य शासन भक्त निवास, भोजनालय, गावातील अंतर्गत रस्ते आदी विकास कामासाठी भरीव निधी देणार आहे. त्यामुळे देवस्थानाच्या विकास कामाला मोठी चालना मिळणार आहे.
काळम्मादेवी देवस्थान हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. राज्यासह इतर राज्यातून भक्त देवीच्य दर्शनास येत असतात. ना. जयंत पाटील यांनी सर्व निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ हा काळम्मादेवीला श्रीफळ वाढवून केला होता. काळम्मादेवी हे आम्हा पाटील कुटुंबियांचे श्रध्दास्थान आहे. नवरात्र उत्सवात काळम्मादेवीचा मोठा जागर केला जातो. देवीला नवस बोलणारे भक्त देवळामागील तलावातून ओल्या पडदीने येऊन इंगळाच्या चरीमधून चालतात. दर शुक्रवार व मंगळवारी देवीच्या दर्शनास मोठी गर्दी असते.
सरपंच हंबीरराव सावंत, प्रकाश सावंत, सदाशिव सुर्यवंशी, लक्ष्मण सावंत, हौसाबाई सावंत, सुधीर सावंत, सुनील सावंत, सचिन सावंत, तानाजी सावंत यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

COMMENTS