Homeताज्या बातम्यादेश

काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जण

भरधाव असलेल्या कारच्या धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू
विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात
बुलढाण्यात पुन्हा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. लहान मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फुलपूर पोलीस ठाण्याच्या करखियाव येथे भरधाव वेगात असलेल्या एर्टिगा कारची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेले. तसेच भीषण अपघाताविषयी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांचा मुलगा वगळता कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण पीलीभीत येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर बनारसहून जौनपूरला जात असताना फुलपूर पोलीस ठाण्याच्या करखियावजवळ हा अपघात झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात व्यस्त आहेत.

COMMENTS