Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्या. सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

नवी दिल्ली ः न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाल 15 महिन्यांचा अस

नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी
पंतजलीने 67 वर्तमानपत्रांमध्ये मागितली जाहीर माफी
अमिताभ आणि अनुष्कावर पोलिसांकडून कारवाई
Image

नवी दिल्ली ः न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाल 15 महिन्यांचा असेल. ते भूषण आर. गवई यांची जागा घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जस्टिस सूर्यकांत यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात आयोजित त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

COMMENTS