Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणी घटनेची न्यायालयीन चौकशी ; बीड घटनेची न्यायालयीन व एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी

नागपूर :हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी देखील परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाची न्यायालयीन कोठडीत असतांना झालेला मृत्यू, तसेच बीड येथील सरपंच सं

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणार्‍यांना क्वारंटाइन करणार : पेडणेकर
तांबवे येथील डॉ. शलाका पाटील यांना पीचडी
महानगरपालिकेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेयांना अभिवादन

नागपूर :हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी देखील परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाची न्यायालयीन कोठडीत असतांना झालेला मृत्यू, तसेच बीड येथील सरपंच संतोष देशमुखचे अपहरण करून केलेली हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करत परभणी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे तसेच बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. संतोष देशमुख याच्या कुटुंबियांना 10 लाखाची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे बीडच्या पोलिस अधीक्षकांना पदावरून हटवण्यात येत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
याविषयी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडच्या पोलिस अधीक्षकांची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. याचा दोष पोलिस प्रशासनाचा देखील आहे. पोलिसांनी देखील आपण एखाद्यावर एखादी फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे ते तपासले पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये हे अशा प्रकारचे काम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या सभागृहांमध्ये तुम्हाला आश्‍वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जे कोणी असतील त्यांची पाळेमुळे आम्ही खणून काढू आणि ज्या सर्वांवर गुन्हे आहेत, त्यावर 302 तर लागेलच पण त्यांच्यासोबत काम करायला जेवढे लोक आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सर्व एकत्रितपणे मोक्का गुन्ह्यासाठी पात्र होतात, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.
परभणी येथील प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्तीची समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रीफडणवीस यांनी केली. मात्र, सूर्यवंशीला पोलिस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सूर्यवंशी यांना दोन वेळा न्यायाधीशासमोर उभे करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी मारहाण केली का? असा प्रश्‍नही त्यांना विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले आहे. तसेच ते पोलिस कोठडीत असतानाचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. असा दावा देखील फडणवीस यांनी केला. वास्तविक सूर्यवंशी यांना श्‍वसनाचा दुर्धर आधार आहे. त्याचा उल्लेख त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लिहिलेला असल्याचे देखीलफडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या जुन्या जखमांचा देखील उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. सूर्यवंशी यांना पोलिस कोठडीतून ज्यावेळी न्यायालयीन कोठडीत नेले गेले, त्यावेळी त्यांना जळजळ होत होती. तशी तक्रार सहकारी कैद्याने केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखाची आर्थिक मदत
संतोष देशमुख यांच्यासारख्या युवा सरपंचाची हत्या झाली त्याचे मोल आपण पैशात करू शकत नाही. पण, एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला राज्य सरकारच्यावतीने दहा लाख रुपयांची मदत करण्यात येईल, त्या संपूर्ण प्रकरणाची गंभीर आणि त्यासोबत जे प्रकरण बाहेर येत आहेत, त्या सर्व प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक अशोक घोरबांडला निलंबित करणार
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली जात होती, त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस घोरबांड यांना निलंबित करून चौकशी करणार असल्याची ग्वाही दिली. फडणवीस पुढे म्हणाले, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त त्यांनी बळाचा वापर केला. याची निश्‍चितपणे चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरबांड यांना निलंबित केला जाईल.

संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करणारा मनोरुग्ण
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या नासधूस प्रकरणाच्या चर्चेवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करणारा आरोपी हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर 12 वर्षांपासून उपचार सुरु आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. पण ही घटना कुठल्याही जातीधर्माच्या द्वेषातून घडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS