Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर श्रीरामपुरमध्ये जल्लोष

श्रीरामूपर ः शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर कॉग्रेसचे माजी उपनगराध

गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल ठेवणार बँक लॉकरमध्ये…; जिल्हा पोलिसांचा विचार सुरु, नियमावली केली जाणार
खोट्या पार्किंगच्या नावाखाली लाखोची फसवणूक
भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने

श्रीरामूपर ः शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर कॉग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी समर्थकासह श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयासमोर जल्लोष केला. यावेळी एकमेकांना लाडू भरवत, फटाके वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. शिर्डीची जागा तिरंगी होत असल्यामुळे या जागेवर कोण विजयी होईल यावर अनेक प्रश्‍न उपस्थित ठरत होते. शिवाय वंचित फॅक्टर चालल्यास वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र वाकचौरे यांनी सुरूवातीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आहे.

COMMENTS