Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अकोल्यात जल्लोष

अकोले ः देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी  हे तिसर्‍यांदा विराजमान झाल्यानंतर अकोले तालुक्यात विविध गावांमध्ये भाजप  अनुसूचित जन जाती मोर्चाचे

दोघा भावांनी केली घरावर दगडफेक
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे नाव ; महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा
केडगाव येथे चार लाखाची वीज चोरी पकडली, एकाविरुद्ध गुन्हा 

अकोले ः देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी  हे तिसर्‍यांदा विराजमान झाल्यानंतर अकोले तालुक्यात विविध गावांमध्ये भाजप  अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली  फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. फिर एक बार मोदी सरकार, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, वैभवभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..असा घोषणा देत जल्लोष साजरा केला.
अकोले शहरात भाजपचे उत्तर नगर जिल्ह्याचे महामंत्री सिताराम भांगरे, अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, खजिनदार  धनंजय संत, तालुका महामंत्री सचिन जोशी, मच्छिंद्र मंडलिक, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, राम रुद्रे, साहेबराव दातखिळे, शिवसेना शहरप्रमुख  गणेश कानवडे, भाजपचे खजिनदार तुषार सुरपुरिया,  मच्छिंद्र चौधरी, दत्तात्रय ताजणे, संतोष भाटे, रमेश राक्षे, विनायक साळवे, वाल्मिक नवले, कैलास तळेकर, बजरंग दलाचेअध्यक्ष, भाऊसाहेब चव्हाण आदींनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी  अनेक गावामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले. अनेकांनी एकमेकाला पेढे भरवून आनंद साजरा केला. तर राजूर येथेही मोठा जल्लोष करण्यात आला.

COMMENTS