Homeताज्या बातम्यादेश

जे.पी. नड्डांच्या अध्यक्षपदाला 2024 पर्यंत मुदतवाढ

जोखीम न पत्करता नव्या चेहर्‍याला संधी देण्याचे टाळले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ 2024 वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

वारी’तून सामाजिक समतेच्या दिशेने प्रवाहित !
कान्होळा नदी परिसरातील जलपर्णी हटवली
परिस्थिती बिघडू नये म्हणून आरक्षण बचाव यात्रा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ 2024 वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. शहा यांनी सांगितले की, नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. नड्डा यांना कायम ठेवून भाजपने एक प्रकारे प्रयोग करण्याची जोखीम टाळल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं नड्डा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कार्यकारिणीपुढं ठेवला. सर्वच सदस्यांनी तो मान्य केला. भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व नड्डा यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये भाजप आणखी मोठ्या बहुमताने विजयी होईल आणि पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करतील, असा विश्‍वासही शहा यांनी यावेळी व्यक्त केला. नड्डा यांनी जुलै 2019 मध्ये पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा हाती घेतली होती. त्यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी त्यांना पूर्णवेळ अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या 20 जानेवारीला संपत आहे. भाजपच्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी सलग दोन कार्यकाळ राहता येते. त्या आधारे त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नड्डा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील आहेत. कोरोनाच्या काळात नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सामाजिक पातळीवर मोठी भूमिका बजावली. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने बिहार, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि पश्‍चिम बंगालमध्येही चांगले यश मिळवले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढेही अशीच कामगिरी करत राहील, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे सुमारे 350 वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. यामध्ये 12 मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री आणि 35 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

COMMENTS