Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार हे घेणारे नाही; तर देणारे : डॉ.आरोटे

सुपा : समाजासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून अहोरात्र काम करणारे पत्रकार हे समाजाला देणारे असून घेणारे नाहीत असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्य

भाजप ट्रान्सपोर्ट सेल व कामगार युनियनच्या तालुकाध्यक्षपदी ठोंबरे
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान केंद्रास भेट
सुपा येथे महाशिवरात्री उत्साहात

सुपा : समाजासाठी आपल्या लेखनीच्या माध्यमातून अहोरात्र काम करणारे पत्रकार हे समाजाला देणारे असून घेणारे नाहीत असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी केले.
निघोज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मळगंगा ग्रामविकास ट्रस्टच्या सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार गुणगौरव आणि सन्मान सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे हे होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि माता मळगंगा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद यांनीही पत्रकारांचा गुणगौरव करून, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे. श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे कार्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकारांनी केलेली मदत कदापिही विसरता येणार नाही. आज समाजामध्ये अनेक समस्या आहे. समाज जागृतीसाठी पत्रकारांनी विशेष काम करावे. ट्रस्टच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहेच. पत्रकारांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम करावे, असे कवाद म्हणाले.
 या कार्यक्रमास संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, मुकुंदराव निघोजकर, विनोद गायकवाड, संतोष कोरडे, सोमनाथ गोपाळे, उपाध्यक्ष वसंत रांधवण, श्रीनिवास शिंदे, निघोज शहराध्यक्ष सचिन जाधव, अनिलराव चौधरी, दीपकराव वरखडे, विकास शेंडकर, संपत वैरागर, भगवान मंदिलकर, विजय रासकर, नितीन परंडवाल, सुनील लोणकर, जयदीप कारखिले, आनंदा भुकन, सागर आतकर, रोहन उनवणे, मेजर उल्हारे, उल्हारे, बनसोडे, राऊत यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS