Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार दादासाहेब काशीद यांचे अपघाती निधन

कराड / प्रतिनिधी : हेळगाव, ता. कराड येथील दैनिक लोकमंथन चे पत्रकार व ज्येष्ठ एलआयसी एजंट दादासाहेब उर्फ महादेव काशीद (वय 55) यांचे रविवार, दि.

प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून अधिसूचना
महाराजस्व अभियानांतर्गत डिस्कळमध्ये 374 शिधापत्रिकांचे वाटप
विधान परिषदेवर हाळवणकर-देशपांडे की पाटील?

कराड / प्रतिनिधी : हेळगाव, ता. कराड येथील दैनिक लोकमंथन चे पत्रकार व ज्येष्ठ एलआयसी एजंट दादासाहेब उर्फ महादेव काशीद (वय 55) यांचे रविवार, दि. 8 रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
पत्रकारितेतील एक निर्भीड सर्व समावेशक व्यक्तिमत्व दादासाहेब काशीद हे दैनिक सकाळ नंतर दै. लोकमंथनमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते. ते श्री संत सेना नाभिक समाजाचे विश्‍वस्त व ज्येष्ठ एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होते. ही घटना कराड तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र, हेळगाव परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व मित्रमंडळींना एक मानसिक धक्का आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह हेळगाव व मसूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS