Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावमध्ये पत्रकाराला बेदम मारहाण

जळगाव : जळगावातील एका मुलीच्या खून प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी जबर मा

विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी तालुका, शहराध्यक्षाची निवड लवकरच -हरिहर भोसीकर
गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात

जळगाव : जळगावातील एका मुलीच्या खून प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञातांनी जबर मारहाण केली. हा हल्ला आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप संबंधित मारहाण झालेल्या पत्रकाराने केला आहे. या पूर्वी देखील संदीप महाजन यांना मारण्याची धमकी देणार्‍या आमदार पाटील यांची व्हॉईस क्लिप ही व्हायरल झाली होती. यानंतर त्यांना ही मारहाण झाली आहे. दरम्यान, या घटनेचा पत्रकारिता क्षेत्रातून निषेध केला जात आहे. या मारहाणीत संदीप महाजन जखमी झाले असून त्यांनी या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

COMMENTS