कोपरगाव : देशातील दिल्ली आणि मुंबई हि दोन महानगरे नेहमीच चर्चेत असतात त्याप्रमाणेच या दोन महानगरांमधील विमान प्रवास देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरत

कोपरगाव : देशातील दिल्ली आणि मुंबई हि दोन महानगरे नेहमीच चर्चेत असतात त्याप्रमाणेच या दोन महानगरांमधील विमान प्रवास देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.असाच दिल्ली मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांनी केला असून या विमान प्रवासात ना.रामदास आठवले यांच्यासमवेत झालेल्या गप्पांमधून मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव मतदार संघातील सावळीविहीर-कोपरगाव (एन.एच.752जी) या राष्ट्रीय महामार्गाचे धीम्या गतीने सुरु असलेल्या कामाचे गार्हाणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्यासाठी आ.आशुतोष काळे दिल्लीला गेले होते. ना.नितीन गडकरी यांची भेट घेवून बुधवार (दि.04) रोजी पुन्हा मुंबईला येण्यासाठी विमान प्रवासात योगा योगाने केंद्रीय समाज कल्याण मंत्री ना. रामदास आठवले यांच्या शेजारीच आ.आशुतोष काळे यांची सीट असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी सामाजिक, राजकीय चर्चा आणि विविध विषयांवर गप्पा गोष्टी करण्याची संधी मिळाली. केंद्र सरकार नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे. शोषित, वंचित आणि मागासलेल्या वर्गासाठी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगत ना. रामदास आठवले यांनी विविध विषयांवर दिलखुलासपणे आ. आशुतोष काळे यांच्या समवेत चर्चा केली.
COMMENTS