Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घारगाव येथे म. ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा संपन्न

श्रीगोंदा : महात्मा फुले उत्सव समिती घारगाव यांच्यातर्फे म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्या

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करा : सभापती प्रा.राम शिंदे
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
जापनीज सेन्सयी हिरायमा आझुमी यांची न्यू आर्ट्समध्ये संयुक्त शैक्षणिक प्रोग्रामसाठी भेट

श्रीगोंदा : महात्मा फुले उत्सव समिती घारगाव यांच्यातर्फे म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने भव्य शालेय वक्तृत्व स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

           शालेय विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित विषय स्पर्धेसाठी देण्यात आले. स्पर्धेसाठी १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला महापुरुषांचे चित्र असलेले आकर्षक पॅड भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. काही स्पर्धकांनी महापुरुषांच्या वेशभूषेत भाषणाचे सुंदर सादरीकरण केले.

      जयंती सोहळ्याच्या निमित्ताने श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे मा. सदस्य रघुनाथ खामकर, आप्पासाहेब शिंदे, बापूराव शिंदे, विष्णू खामकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नूतन संचालक आप्पासाहेब जगताप, घारगाव सोसायटीचे नूतन चेअरमन माधव जगताप, भूषण बडवे, अनिल मोळक, शाहीदास थिटे, अण्णासाहेब जगताप, सचिन शेलार , दत्तात्रय पानसरे, जालिंदर खामकर, संपत कुचेकर,मा.मुख्याध्यापिका सुमन खामकर, विमल खामकर, माऊली गलांडे यांच्यासह महात्मा फुले उत्सव समितीचे सर्व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खामकर व रामसिंग खामकर यांनी केले.

COMMENTS