नाशिक प्रतिनिधी - मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जनजागृती दौरा दिनांक ५ ते ११ ज

नाशिक प्रतिनिधी – मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जनजागृती दौरा दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२४ दरम्यान सुरू करण्यात आलेला आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिक येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी नाशिक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने नाना बच्छाव,चंद्रकांत बनकर,शिवाजी सहाणे,करण गायकर, ज्ञानेश्वर कवडे,श्री.विष्णुपंत घुगे,वैभव दळवी,शरद लोणकर,कैलास खांडबहाले, योगेश नाटकर,विकी देशमुख,निलेश ठुबे, हर्षल पवार,ज्ञानेश्वर सुराशे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका निहाय बैठकीची सुरुवात सकाळी ११ वाजता सुखसागर हॉटेल येथे त्र्यंबकेश्वर तालुक्याची बैठक संपन्न झाली. त्यानंतर दुपारी ३ वाजता मातोश्री लॉन्स या ठिकाणी इगतपुरी तालुका तर संध्याकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह,सिन्नर येथे सिन्नर तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या बैठक संपन्न झाली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी बैठकीमध्ये दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा लढा गरीब मराठ्यांसाठी असल्याने सर्व मराठ्यांनी या आंदोलनाला ताकद द्यावी तसेच सहकुटुंब आपआपली शिदोरी सोबत घेऊन या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे तसेच तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या घरोघरी जावून आजपासून जनजागृती करत मुंबई येथे सर्वांनी येण्याचे निमंत्रण द्यावे. हा अंतिम लढा असून या लढ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेलच आणि हे सत्य आहे आता आरक्षण मिळूनच आपण घरी येणार आहोत हा संकल्प करूनच मुंबईला सर्व मराठा समाजाने येण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे मराठा नेते शिवाजी सहाणे यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रातून जे मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यातून धान्य,तांदूळ,तेल,शेंगदाणे,डाळ यांसह अन्य लागणारी अन्न सामग्री आपल्या तालुक्यातील गण,गट व तालुक्याच्या ठिकाणी जमा करावे.तसेच समाजातील दानशूर व्यक्तीनी आर्थिक मदत करणार असतील ती त्यांनी सकल मराठा समाजाच्या नावाने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या बँक खात्यामध्ये क्यू आर कोड च्या माध्यमातून ऑनलाइन जमा करावे असे आवाहन केले.
नाशिक मधील उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मागील आंदोलनाचा इतिहास पाहता मराठ्यांनी हे आंदोलन अत्यंत शिस्तप्रिय व शांततेच्या मार्गाने करायचे आहे मुंबईला कोटींच्या संख्येने जमून मुंबई बंद पाडायची आहे, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एक दिलाने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन समाज बांधवांना केले. तसेच यापुढे ही जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये नियोजन ठरल्याप्रमाणे बैठका होतील व समाज बांधवांना सविस्तरपणे या आंदोलनात आपल्याला काय करायचे आहे याची माहिती देऊन मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
सदरची लढाई ही शेवटची असल्याने येणाऱ्या पुढील पिढीसाठी गरजेची असल्याने प्रत्येक घरातील समाज बांधवांनी मुंबई येथे जाण्यासाठी सज्ज रहावे. त्रंबकेश्वर येथील बैठकीत मराठा समाज बांधव पुरुषोत्तम कडलक,नवनाथ कोठुळे,रवींद्र वारुंगसे, कैलास मोरे,बाळासाहेब वारुंगसे,संतोष मेढे,ज्ञानेश्वर महाले,शिवाजी कसबे,रंगनाथ मिंदे,राज चव्हाण आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईगतपुरी येथील बैठकीत नारायण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य जया जाधव,भाऊसाहेब कडभाने,रवींद्र गव्हाणे,तुकाराम सहाणे,नामदेव शिंदे,संदीप बरे,विजय जाधव,प्रताप जाधव,मनोज सहाणे.
तसेच सिन्नर येथील तालुक्याच्या बैठकीत विलास पांगारकर,विठ्ठल राजे उगले,ज्ञानेश्वर ढोली,प्राध्यापक राजाराम मुंगसे,पप्पू गोडसे,स्वप्निल डुंबरे,प्राध्यापक सचिन उगले,दत्ताजी वायचळे,रवींद्र मोगल, कॉम्रेड हरिभाऊ तांबे,दत्ता हरळे, अण्णासाहेब खाडे,अमोल देशमुख,मिलिंद गायकवाड,अतुल पांगारकर,आदित्य उगले,वामनराव गाडे,राजेंद्र चव्हाण के इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व समाज बांधवांनी तालुक्यात जिल्हा कमिटीने सांगितल्याप्रमाणे नियोजन करण्याचे ठरवले असून जास्तीत जास्त संख्येने मुंबई येथे मिळेल त्या वाहनाने व सोयीने रसद पुरवठा करू असे आश्वासन दिले आहे.
COMMENTS