Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपुरात राज्यपाल कोश्यारींच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने निषेध

इस्लामपूर : राज्यपालांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करताना पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते. इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी
कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ
बेकायदेशीर सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आज रविवारी इस्लामपूरातील सर्व पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. राज्यपाल कोश्यारीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यासमोर आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
विद्रोही सांस्कृतिकचे कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले, भाजप व आरएसएसची भूमिका पुन्हा पुन्हा राज्यपाल बोलत आहेत. ती भूमिका महाराष्ट्राची व मराठी माणसांचा अपमान करणारी आहे. महाराष्ट्र व मुंबई हा मराठी माणसाने लढून मिळवलेला असल्याने असले वक्तव्य महराष्ट्रात खपऊन घेतले जाणार नाही. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील, राज्याच्या घटनात्मक पदावर सर्वोच्च स्थानी असणार्‍या राज्यपालांनी केलेली वक्तव्ये बेताल आहेत. ते सतत अशी वक्तव्य करत असल्याने त्यांचे मानसिक आरोग्य तपासायला हवे. असे राज्यपाल राज्याच्या इतिहासाला काळीमा आहेत. राज्यपालांना हटवल्याशिवाय मराठी माणूस स्वस्त बसणार नाही. केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे अशी आमची मागणी आहे.
यावेळी कॉम्रेड दीपक कोठावळे, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष सुयोग औंधकर, मराठा सेवा संघ वाळवा तालुका अध्यक्ष उमेश कुरळपकर, शाकीर तांबोळी, मराठा सेवा संघ शहर अध्यक्ष विजय महाडिक, व्यापारी महासंघाचे प्रमुख मोहन पाटील, उदय सरनोबत, यशवंत धुमाळे, सत्यजित माने, प्रा. डॉ. राम घुले, डॉ. सूर्यवंशी, प्रवीण पाटील, प्रवीण कुरळपकर, सागर निकम, सागर जाधव, सुनील पाटील, सचिन पवार, हेमंत पाटील, विजय कुंभार व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS