Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष

राष्ट्रवादी कडून आज हा जल्लोष आणि निषेध एकच वेळी दर्शवण्यात आला

मुंबई प्रतिनिधी - मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'गद्दार पेहाचाने कोण, निषेध.निषेध.निषेध. या आशयाचे बॅनर घेऊन अनोखे आंदोलन.. यावेळी राष्ट्र

तटकरेंसारखा नटसम्राट पाहिला नाही
आव्हाडांना अटक करणार्‍या उपायुक्तांची बदली
‘हॅलो’ला विरोध करणाऱ्यांच मतपरिवर्तन करू…

मुंबई प्रतिनिधी – मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘गद्दार पेहाचाने कोण, निषेध.निषेध.निषेध. या आशयाचे बॅनर घेऊन अनोखे आंदोलन.. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा स्थानिक आमदार यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्या प्रकरणी फटाक्यांची आतिषबाजी करून आणि ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला. जल्लोष देखील साजरा करण्यात आला होता. यावेळी आव्हाड यांना समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्य परेशान हो सकता है पराजित नाही’ या आशयाचे बॅनर हाती घेण्यात आले होते तर याच जल्लोष दरम्यान कार्यकर्त्यांकडून ‘गद्दार’ या शब्दाचा वापर करत बॅनर हातात घेऊन निषेध दर्शवण्यात आला. आव्हाड यांना अटकेनंतर राष्ट्रवादीचे पूर्व नगरसेवक राजन केणे यांना आमदारकी हवी असल्यामुळे कटकारस्थान रचत हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर मुंब्रा येथील राष्ट्रवादी कडून आज हा जल्लोष आणि निषेध एकच वेळी दर्शवण्यात आला.

COMMENTS