Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिया अग्रवालने बारावीत मिळवले 94 टक्के गुण

राहुरी ः महाराष्ट्राचा बारावीचा निकाल नुकताच लागला असून त्यानुसार कॉमर्स विभागातून राहुरी येथील जिया मयुरेश अग्रवाल हिला 94.50 गुण मिळाले. जिया अ

द सेवा मंडळाच्या सेवक प्रतिनिधी निवडणुकीत प्रगती पॅनलची बाजी
सिंगल फेजने विद्युत पुरवठा मिळावा यासाठी कोरडगाव ग्रामपंचायत आणि वंचितच्या वतीने महावितरणला निवेदन
युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी : तहसीलदार नानासाहेब आगळे

राहुरी ः महाराष्ट्राचा बारावीचा निकाल नुकताच लागला असून त्यानुसार कॉमर्स विभागातून राहुरी येथील जिया मयुरेश अग्रवाल हिला 94.50 गुण मिळाले. जिया अग्रवाल हिला अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळाला आहे. जिया मयुरेश अग्रवाल ही राहुरीची रहिवासी असून सुपरिचित श्री प्रवीण फकीरचंद अग्रवाल यांची नात, तसेच किराणा व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मयुरेश प्रवीण अग्रवाल यांची मुलगी आहे. तिचे बारावीचे कॉमर्सचे शिक्षण देसरडा भंडारी प्रोफेशनल अकॅडमी संचलित बजरंग कॉलेज (नगर) येथे झाले असून तिला त्यांच्या पूर्ण टीमचे मार्गदर्शन मिळाले आहे. जिया अग्रवाल हिच्या याबद्दल राहुरी शहरातून, अग्रवाल यांचे नातेवाईक, व्यापारी, मित्रमंडळीकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS