Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताहराबादमध्ये घराचे कुलूप तोडून दागिने चोरीला

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस

अहमदनगर शहरात राष्ट्रवादीला जबर झटका… माजी विरोधीपक्षनेता काँग्रेसमध्ये सामील
लाच प्रकरणातील पोलिसाला अखेर पोलिसांनी पकडले
बाबूजींनी पाथर्डी तालुक्यात शिक्षणाची गंगोत्री आणली ः अविनाश मंत्री

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे ताहराबाद परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मच्छिंद्र बाळासाहेब औटी, वय 40 वर्षे, यांचे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे घर असून त्यांचे दुसरे घर ताहराबाद येथील त्यांच्या शेतात आहे.
ते सध्या शेतातील घरात राहत आहेत. 21 जुलै 2024 रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात भामट्यांनी औटी यांचे ताहराबाद गावातील घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करुन भामट्यांनी घरातील 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे व 5 हजार रुपए रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला. 22 जुलै 2024 रोजी सकाळी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. मच्छिंद्र बाळासाहेब औटी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 832/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

COMMENTS