कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील नाटेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाचे जयवंत बाबासाहेब मोरे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक न

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील नाटेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाचे जयवंत बाबासाहेब मोरे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी काम पाहिले. या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले.
जयवंत मोरे यांच्या नावाची सुचना गणेश आप्पासाहेब मोरे यांनी केली, याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच यांचे सर्वश्री. डी. पी. मोरे, महिपत देवराम मोरे, रामदास दामु मोरे, बाबासाहेब गंगाधर मोरे, डॉ गोरक्षनाथ मोरे, नारायण कारभारी मोरे, राजेंद्र आप्पासाहेब मोरे, नानासाहेब मोरे, गणेश अशोक मोरे, दगु सखाहरी मोरे, जयराम भिकाजी मोरे, प्रकाश धोंडु वाघ, शिवाजी काशिनाथ मोरे, कार्तिक राधाकृष्ण मोरे, बाळासाहेब जगन्नाथ मोरे, गणेश अशोकराव मोरे, ताराचंद निवृत्ती मोरे, भरत सावळेराम अष्टेकर, जालिंदर त्रिंबक तिपायले यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच जयवंत मोरे व माजी सरपंच विकास मोरे यांचा सत्कार करण्यांत आला. गावविकासासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय निमशासकीय योजनांची अंमलबजावणी करू असे सरपंच जयवंत मोरे म्हणाले, तर ग्रामसेवक बी. के. बागुल यांनी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहुन उपस्थितांचे आभार मानले
COMMENTS