Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयेश मेस्त्री यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

मुंबई ः मराठी साहित्यविश्‍वात मानाचा समजला जाणारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 जाहीर झाला असून यंदा विविध वाङ्मय प्रकारांत

उत्तरप्रदेशातील अपघातात 10 जणांचा मृत्यू
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
इस्लामपूरात दूषीत पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : सुजित थोरात

मुंबई ः मराठी साहित्यविश्‍वात मानाचा समजला जाणारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 जाहीर झाला असून यंदा विविध वाङ्मय प्रकारांत एकूण 35 साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. बाल वाङ्मय विभागातील ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ हा सन्मान यंदा बालसाहित्यिक जयेश मेस्त्री यांच्या ‘जादूचा दिवा’ या बालनाट्य पुस्तकाला प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने मेस्त्री यांच्या बालसाहित्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याला राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. प्रौढ वाङ्मय आणि बृहन्महाराष्ट्र विभागासाठी प्रत्येकी एक लाख रुपये, तर बाल व प्रथम प्रकाशन विभागासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ अंतर्गत जयेश मेस्त्री यांना पन्नास हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा 27 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला साहित्य, कला आणि प्रशासन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जयेश मेस्त्री यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. ‘जादूचा दिवा’ या बालनाट्य पुस्तकाला मिळालेला हा सन्मान आपल्या लेखनप्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. भा. रा. भागवत यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असून त्यामुळे पुढील कार्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या दोन दशकांतील लेखनप्रवासाचा हा सन्मान असल्याचे सांगत त्यांनी आपल्या कुटुंबीय, मार्गदर्शक, प्रकाशक आणि वाचकांचे आभार मानले.

COMMENTS