जयंत पाटीलांचा जातीय अभिनिवेश, आणि…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

जयंत पाटीलांचा जातीय अभिनिवेश, आणि…

   महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन राज्यपाल यांनी बोलावले ज्यात आज पहिल्या दिवशी सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. सोमवारी याच

टाटांचा स्वागतार्ह निर्धार !
तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची धाडसी कारवाई
मुंबईत मराठा समाजाने आरक्षणासाठी काढला मोर्चा

   महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन राज्यपाल यांनी बोलावले ज्यात आज पहिल्या दिवशी सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. सोमवारी याच अधिवेशनात नव्याने स्थापन झालेल्या सकारला आपले बहुमत सिध्द करावे लागेल. अर्थात, सभागृह अध्यक्ष निवडणुकीत समर्थनार्थ १६४ आणि विरोधात १०७ मते मिळाली, यावरून हा अंदाज पक्का होतो की, सरकार बहुमत सिध्द करेल. वर्तमान अधिवेशन बोलवण्यापासून तर सभागृहातील सदस्यांची अपात्रता आदि पर्यंत अनेक याचिका कोर्टात प्रलंबित आहेत. त्यावर किती काळाने निर्णय होईल हे, सांगता येत नाही, कारण वेळेची सीमा यासाठी निर्धारित नाही. असो. मात्र, आज विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली. सर्वच सदस्यांनी त्यांच्या विद्वतेचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. त्याचवेळी ते राज्याचे कायदा मंत्री होता-होता राहीले, असा उल्लेखही अनेक सदस्यांनी आपल्या भाषणातून केला. सभागृह अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना अबू आझमी यांनी छोट्या पक्षांची कामे होत नाहीत आणि त्यांच्या सदस्यांना सभागृहात पुरेसा वेळा दिला जात नसल्याची खंत व्यक्त करतानाच औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्यास त्यांनी विरोध दर्शविला. बहुधा, त्यामुळेच ते अध्यक्षीय निवडणुकीत तटस्थ राहिले. सभागृहात आज विनोद करण्यास सर्वच सदस्यांनी प्राधान्य दिलेले दिसले तरी आदित्य ठाकरे यांनी राजकारणाचा दर्जा पाहता आजची तरुण पिढी राजकारणात येण्यास उत्सुक असेल का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. मात्र, सभागृहात आज आपल्या जातीय अभिनिवेशाचे प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केलेच. त्यांच्या भाषणातील जातीय अभिनिवेश व्यक्त होताच काही सदस्यांनी आक्षेप नोंदवला. परंतु, त्यांच्या शेजारी बसलेल्या अजित पवार यांनी त्या अभिनिवेशाकडे दुर्लक्ष करून जयंत पाटील यांना पुढे बोलत राहण्याची सूचना केली. या घटनाप्रसांगातून या दोन्ही नेत्यांच्या मेंदूत जातीव्यवस्था किती घट्ट रूजली याचे ओंगळ दर्शन सभागृहासोबतच उभ्या महाराष्ट्राला झाले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ते कामकाजातून काढून टाकावं अशी सूचना अतिशय बेफिकीर वृत्तीनेच त्यांनी स्वतः केली. सभागृहाचे उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांनी, ‘ आदिवासी असूनही अध्यक्ष पदाचे कार्य बऱ्यापैकी केले’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. सभागृहात सदस्यांच्या सामाजिक स्थितीचा म्हणजे जातीचा उल्लेख करायचा आणि मग त्यांच्या उत्तम कामाची भलावण बऱ्यापैकी अशा शब्दांत करायची ही मानसिकता जयंत पाटील यांच्या जातीय मानसिकता प्रकट करते. त्याचवेळी अजित पवार यांनी त्यांना थांबवून मुद्दा त्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज असताना, इतर सदस्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही तसेच चालू ठेवावे, ही सूचना करणेही जातीय अभिनिवेशाची पातळी व्यक्त करण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला मिळालेले नवे अध्यक्ष कायद्याचे तज्ज्ञ आहेत. व्यासंग दांडगा आहे. त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना लोकशाही वृध्दिंगत करित आणल्याचा ब्रिटिश संसदीय लोकशाहीची चांगली उदाहरणे दिली. सभागृहात लोकशाही पध्दतीने चर्चा करायला वाव देऊ. चर्चेशिवाय कोणतेही विधेयक मंजूर केले जाणार नाही, याची हमी नव्या अध्यक्षांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेपासून यापूर्वी रोखले गेले होते, म्हणून नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून राज्याच्या विधानसभेला अध्यक्ष नव्हता. आता पूर्णवेळ अध्यक्ष मिळाल्याने सभागृहात विविध विधेयकांवर परिपूर्ण चर्चा होतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही! सोमवारी सभागृहात सरकारची बहुमत चाचणी होऊन हे अधिवेशन संपन्न होईल. मात्र, ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडते याची उत्सुकता देशातील जनतेला आहेच !

COMMENTS