Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या दुसर्‍या दिवशी जय हनुमान पतसंस्था टायगर्स हा संघ डॉर्क हॉर्स ठरला

निनाईनगर : ’जयंत कबड्डी प्रिमियर लीग’मध्ये जय हनुमान पतसंस्था टायगर्स संघासमोर चढाई करताना राजारामबापू ईगल्सचा कन्हैय्या बोडरे. इस्लामपूर / प्रतिन

पंचांनीच हरवायचे ठरवले तर जिंकणार कसे ?
क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात
वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू निवृत्त

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर (निनाईनगर) येथील जयंत स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या ’जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या दुसर्‍या दिवशी जय हनुमान नागरी पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर) हा संघ डॉर्क हॉर्स ठरला. पहिल्या दिवशी मोठ्या फरकाने पराभूत या संघाने दोन संघांना अस्मान दाखविले. स्व. शरद लाहिगडे हरिकन्स (कासेगाव), शिराळा कोब्रा या पहिल्या दिवशी पराभूत संघांनी आज आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला. शिराळा कोब्रा विरुध्द स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) या संघातील शेवटचा सामना अतिशय अटीतटीचा झाला. शेवटी दोन्ही संघाने 14-14 गुण मिळविल्याने हा सामना बरोबरीत राहिला. राज्याचे जल संपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक, राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शना खाली सलग दुसर्‍या वर्षी ही लिग आयोजित केली आहे.
जय हनुमान नागरी पतसंथा टायगर्स (इस्लामपूर) या संघाने पहिल्या सामन्यात स्व. जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) या संघास 11 गुणांनी,तर दुसर्‍या सामन्यात राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या संघास केवळ 2 गुणांनी मात दिली. स्व. शरद लाहिगडे हरिकन्स (कासेगाव) या संघाने राजेंद्रभाऊ पाटील युवा मंच फायटर्स (वाळवा) या संघास 12 गुणांनी पराभूत केले. मात्र, या संघास शिराळा कोब्रा या संघाकडून 10 गुणांनी पराभव पत्करावा लागला. स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) या संघाने आदिती पँथर्स (ओझर्डे) या संघावर 7 गुणांनी मात केली. मात्र, हा संघ राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या संघाकडून अटीतटीच्या लढतीत 6 गुणांनी पराजित झाला. आदिती पँथर्स (ओझर्डे) या संघाने शिराळा कोब्रा या संघास 10 गुणांनी पराभूत केले.
प्रांताधिकारी डॉ. संपतराव खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे, इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली, मिरज व कुपवाड महानगर पालिका क्षेत्राचे अध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष पै. राहुल पवार, माजी सभापती हरिदास पाटील, तनिष्का फौंडेशनचे अध्यक्ष अनिल जाहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुणभाऊ कांबळे, भास्कर मोरे, अशोक इदा ते यांनी स्पर्धेस भेट देवून कबड्डीचा आनंद घेतला.
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, कामेरीचे विकास पाटील यांनी तांत्रिक समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. सांगलीचे आलम मुजावर, निलेश देसाई, कामेरीचे जयराज पाटील, रणजित इनामदार, अमोल पाटील, वाळव्याचे सागर हेळवी, साईल जमादार यांनी पंच म्हणून जबाबदारी पाहिली. माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, शिराळ्याचे पृथ्वी नाईक, विश्‍वप्रताप नाईक, आदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील, वाळव्याचे रवी पाटील, कासेगावचे अतुल लाहिगडे, जुनेखेडचे सागर पाटील, संजय जाधव यांच्यासह क्रीडाप्रेमींनी कबड्डी सामन्यांचा आनंद लुटला.
जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, प्रशिक्षक विजय देसाई, उमेश रासनकर, माजी नगरसेवक सदानंद पाटील, सचिन कोळी, शिवाजी पाटील, फिरोज लांडगे, आयुब हवलदार, अजय थोरात, किरण पाटील, अंकुश जाधव, अभिजित पाटील, मंगेश चौधरी, संदीप कोळी यांच्यासह स्पोर्ट्सचे खेळाडू स्पर्धेचे संयोजन करत आहेत.

COMMENTS