Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाशिम जिल्ह्यातील जवान भारत-चीन सीमेवर शहीद

वाशीम प्रतिनिधी - भारतीय सैन्य दलात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्याचे सुपूत्र अमोल गोरे हे भारत चिन सीमेवर अरुणाचल प्रदेश ये

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही शिंदेंना पाठिंबा .
एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ

वाशीम प्रतिनिधी – भारतीय सैन्य दलात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्याचे सुपूत्र अमोल गोरे हे भारत चिन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असताना शहीद झाले आहेत. भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश कामेंग येथे बचाव कार्यादरम्यान, दोन जवानांना वाचवताना त्यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्यावर 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 11 चे दरम्यान वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते आणि पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. 25 एप्रिलला ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना देशसेवा करताना वीरमरण आलं. अमोल यांच्या पश्चात 4 वर्षांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अमोल सारख्या धाडसी व मनमिळावू जवानाच्या शहीद होण्यानं वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS