Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावलीचे जवान प्रथमेश पवार यांना विरमरण

कुडाळ / वार्ताहर : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील शहिद जवान प्रथमेश संजय पवार यांच्यावर आज सकाळी साडेदहा वाजण्याच्

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध
श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याची तयारी वेगाने सुरू; वारकर्‍यांच्या सोयी-सुविधांची कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करावीत : शेखर सिंह
त्रिपुडी येथील सोन्या नावाच्या चंद्रकोर बोकडाला 23 लाखाची बोली

कुडाळ / वार्ताहर : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील शहिद जवान प्रथमेश संजय पवार यांच्यावर आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दत्तमंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा लहान भाऊ आदित्य पवार यांनी मुखाग्नी दिला. शहिद जवान प्रथमेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह संपूर्ण जावळी तालुका, जिल्हाभरातून हजारो नागरिक बामणोली येथे आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
बामणोलीसह आजूबाजूच्या गावागावात पहाटेपासून देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पुणे येथून त्यांचे पार्थिव सकाळी सात वाजता पाचवड, ता. वाई येथे आणण्यात आले. येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून जवान प्रथमेश यांचे पार्थिव घेऊन निघालेली शोभायात्रा सरताळे, कुडाळ, शेते, सोमर्डी मार्गे, बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी येथे पोहचली. त्यानंतर त्यांच्या घरी पार्थिव नेण्यात आले, पार्थिव घरी पोहचताच जवान प्रथमेश यांच्या आईने व लहान भाऊ आदित्य यांनी केलेला आक्रोश उपस्थितीतांचे मन हेलावून टाकणारा होता.
सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सातारा-जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.

COMMENTS