Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जसप्रीत बुमराह च्या फॅमिलीत आला‌ नवा चिमुकला

मुंबई प्रतिनिधी - टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर होता. आशिया चषकाच्या निमित्ताने पु

भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास
बीसीसीआयचा  ऋषभ पंतच्या कमबॅकसाठी ग्रीन सिग्नल
गाडी थांबवून सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित

मुंबई प्रतिनिधी – टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर होता. आशिया चषकाच्या निमित्ताने पुन्हा बुमराहची धडाकेबाज खेळी पाहायला मिळणार असा विचार करून चाहते आनंदी झाले होते. पण आयत्या वेळी बुमराहला श्रीलंकेतून पुन्हा मायदेशी परतावे लागले. रविवारी तातडीने बुमराह कोलंबो येथून निघाला व मुंबईत पोहोचला. बुमराहने खाजगी काम असल्याने आशिया चषकात पुढे खेळता येणार नसल्याचे सांगितले होते. इतक्या मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा बुमराह दिसणार नाही म्हणून पुन्हा चाहते नाराज झाले होते पण आता ही नाराजी दूर करणारी अत्यंत गोड बातमी बुमराहने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जसप्रीत बुमराह व संजना गणेशन या गोड जोडप्याने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. बुमराहने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपल्याला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. “आमचे छोटेसे कुटुंब आता मोठे झाले आहे. आज सकाळी आमच्या लहान बाळाने आमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. अंगद जसप्रीत बुमराहचे आम्ही जगात स्वागत करतो. आमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय व त्याला जोडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत – जसप्रीत आणि संजना” असे ट्वीट बुमराहने केले आहे.

COMMENTS