Homeताज्या बातम्याक्रीडा

जसप्रीत बुमराहचं धमाकेदार कमबॅक

भारत आणि आयर्लंड यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत दुखापतीतून सावरणाऱ्या जसप्रीत बुमराहवर निवड

अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
यशाच्या शिखरावर असलेल्या टिम इंडियाचा शेअर बाजार एकाएकी कोसळला कसा ?                
फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला

भारत आणि आयर्लंड यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत दुखापतीतून सावरणाऱ्या जसप्रीत बुमराहवर निवड समितीसह सर्वांचं लक्ष होतं. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने जलवा दाखवला अन् जस्सी इज बॅक असा संदेश सर्वांना पाठवला आहे. आयर्लंडविरुद्ध बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. टीम इंडियाकडून आयर्लंड दौऱ्यात प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंग यांना टी-20 पदार्पणाची संधी मिळाली आहे. सोबतच जसप्रीत बुमराह देखील 10 महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. अशातच पहिल्या बॉलवर फोर बसल्यानंतर बुमराहने दुसऱ्याच बॉलवर सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीचा बोल्ड काढला. तर पाचव्या बॉलवर लॉर्कन टकरला देखील बाद केलं. रवी बिश्नोई.काय म्हणतो जसप्रीत बुमराह?इथं आल्याचा खूप आनंद झाला. इथलं हवामान सुंदर दिसतंय. मला बरं वाटतंय आणि मी क्रिकेट खेळायला उत्सुक आहे. आपण काय गमावत आहात याची जाणीव होते, परत आल्याने खूप आनंद झालाय. आम्हाला आयर्लंडकडून लढतीची अपेक्षा आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून मला आशा आहे की खेळपट्टी काहीतरी चमत्कार दाखवेल. टीम इंडियाकडून रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णा असे दोन पदार्पण आहेत. त्यांना फक्त त्यांच्या क्रिकेटचा आनंद घेण्यास सांगितलं, असं बुमराहने टॉसवेळी म्हटलं आहे.

COMMENTS