Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर रेल्वे स्थानकावर ‘जन औषधी केंद्र’

सोलापूर ः सोलापूर रेल्वे स्थानकावर जन औषधी केंद्राचे स्टॉल उघडले आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना कमी दरात रेल्वे प्रशासनांनी जनरिक औषधे उ

‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी “या” सूचना पाळा
कोपरगाव : पाणीपुरवठा योजना कालव्यावर आरक्षण मिळावे : आ. आशुतोष काळे

सोलापूर ः सोलापूर रेल्वे स्थानकावर जन औषधी केंद्राचे स्टॉल उघडले आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना कमी दरात रेल्वे प्रशासनांनी जनरिक औषधे उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवासात जर तुमची औषधी संपली अथवा औषधीची  गरज भासल्यास चिंता करण्याची गरज नाही किंवा कुठेही भटकण्याची गरज नाही आता रेल्वे स्थानकावरच आपल्याला सर्व औषधी उपलब्ध होतील. सोलापूर रेल्वे स्थानकात प्रवेश करतांना डाव्या बाजूला हे जन औषधी केंद्राचे स्टॉल आहे. हे स्टॉल मार्च महिन्या पासून सुरु करण्यात आले आहे. तरी रेल्वे प्रवाशांनी आणि नागरिकांनी रेल्वे स्थानकावरील ‘जन् औषधी केंद्रावरील’ औषधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.

COMMENTS