Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडचे गटविकास अधिकारी यांची विभागीय चौकशीची मागणी

अरणगाव ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार व सदस्यांच्या तक्रारींची बेदखल

जामखेड ः जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार, अनियमितता, अपसंपतेच्या अपहार अशा तक्रारींची दखल न घेणार्‍या गटविकासाधिकारी यांच्या भु

कोपरगाव शहरातील विदयुत पुरवठा सुरळीत करा,अन्यथा आंदोलन उभारू- पाठक
WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा |
बेलापूरात महिलांचे पोलीस बांधवांसमवेत अनोखे रक्षाबंधन l LokNews24

जामखेड ः जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार, अनियमितता, अपसंपतेच्या अपहार अशा तक्रारींची दखल न घेणार्‍या गटविकासाधिकारी यांच्या भुमिकेवर संशय आहे. ग्रामपंचायत भ्रष्टाचारात गटविकासाधिकारी सामील असल्याचा आरोप करीत गटविकासाधिकारी  यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे 24 मे रोजी अरणगाव ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 27 फेबु्रवारी 2023 रोजी अरणगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचार, अनियमित्ता व अपसंपतेच्या अपहाराबद्दल ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार अर्ज पंचायत समितीकडे दिला होता, गटविकास अधिकारी यांनी दि 13 एप्रिल 2023 रोजी चौकशी पूर्ण करून दि 21 एप्रिल 2023 अगोदर अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिलेले होते परंतु आजतागायत अरणगाव ग्रामपंचायतची कुठलीही चौकशी झालेली नाही अथवा कोणीही अधिकारी चौकशीसाठी अरणगावात आले नाहीत.

याबाबत गट विकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून लवकरात लवकर चौकशी करण्याबाबत विनंती केली होती परंतु त्यावर देखील टाळाटाळ केल्यानंतर सदस्यांनी दि 08 एप्रिल 2024 अरणगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला त्यावर गटविकासाधिकारयांनी एक कमिटी गठीत करून ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे आदेश दिले व टाळे न ठोकण्याचे आवाहन केले होते, परंतु त्या आदेशानंतर देखील आजतागायत चौकशी झालेली नाही, त्यांनी स्वतः काढलेल्या दोन्ही आदेशांना त्यांनीच केराची टोपली दाखवलेली आहे व ते भ्रष्टाचार करणार्‍यांना पाठीशी घालत आहेत किंबहुना ते त्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत का अशी शंका आम्हाला येत आहे, कारण दोन वेळा स्वतः आदेश काढून देखील एक वर्षापासून चौकशी होत नसेल तर त्यासाठी सर्वस्वी गटविकास अधिकारी  हे जबाबदार आहेत, तसेच ते राजकीय दबावापोटी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत म्हणून त्यांची लवकरात लवकर विभागिय चौकशी करून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा लवकरच अरणगाव ग्रामपंचायतचे सदस्य जिल्हा परिषद, अहमदनगर कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. अरणगाव येथील जनतेला न्याय देण्यासाठी या ग्रामपंचायतची चौकशीसाठी एक जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.या सर्व प्रकरणात गटविकास आधिकारी यांनी झोपेचे सोंग घेतलेले दिसत आहे. जिल्हा प्रशासन काय कारवाई करील याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

गटविकास अधिकारी यांचे झोपेचे सोंग – ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्यासाठी स्वतः गटविकास अधिकारी यांनी दोन वेळा चौकशीचे आदेश काढले, चौकशी समिती देखील नेमली. मात्र एक वर्षा पासून त्यांना चौकशीसाठी मुहूर्त सापडत नाही. त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव आहे का? ते कोणाला वाचवत आहेत का? की स्वत:ला वाचवत आहेत.?असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

COMMENTS