जामखेड :सोयाबीन हमीभाव केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळावे म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समिती प्रयत्नशील होती. तसेच उपसभापती कैलास
जामखेड :सोयाबीन हमीभाव केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळावे म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समिती प्रयत्नशील होती. तसेच उपसभापती कैलास वराट यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा मार्केटिंगने कृषी उत्पन्न बाजार समितीला आयडी दिला आहे. दि 28 नोव्हेंबर रोजी हमीभाव केंद्राचे उद्घाटन झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सभापती शरद कारले, उपसभापती वराट कैलास देवराव, संचालक सुधीर राळेभात, घुमरे सचिन, भोंडवे विष्णु, उतेकर गौतम, ढवळे अंकुश, शिंदे सतिष, चव्हाण रतन, शिंदे अनिता, जगताप गणेश, जायभाय नारायण, पाटील वैजीनाथ, ससाणे सिताराम, गोरे नंदकुमार, पवार सुरेश, बेदमुथ्था राहुल, हुलगुंडे रविंद्र, सचिव वाहेद सय्यद सह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी बाजार समितीने दोन महिन्यापूर्वी मार्केटिंग फेडरेशनकडे प्रस्ताव देऊन दहा लाख रुपये डिपॉझिट रक्कम भरूनही ते त्यांनी नाकारले होते. मार्केटिंग फेडरेशनने सोमवारी बाजार समितीचे सचिव वाहेदभाई सय्यद यांना फोन करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे सांगून तातडीने पोर्टलवर नोंद करा तुम्हाला आयडी मिळेल व शेतकर्यांच्या नोंदी करा असे कळविण्यात आले. जामखेड तालुक्यात यावर्षी वेळेवर पाऊस झाल्या मुळे खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग उत्पादनात चांगली वाढ झाली. पण बाजारपेठेत दर पडल्याने व शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकर्यांनी कनवडीमोल दराने मालाची विक्री करण्याची वेळ आली होती. आता हमीभाव केंद्र सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाने वातावरण निर्माण झाला आहे.या हमीभाव केंद्राचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS