Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जाामखेड शहर अस्वच्छतेच्या विळख्यात

राजकारणी आणि प्रशासनाची मात्र डोळेझाक

जामखेड/प्रतिनिधी ः संपूर्ण देशभरात महात्मा गांधींच्या जयंतीच्या एक दिवस आधी एक तास स्वच्छेता उपक्रम राबविण्यात येत आहे. यामागचा उद्देश म्हणजे स्व

राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूमन कमविले कोटयवधींची माया ?
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल
संतसाहित्य माणुसकीचे भरणपोषण करणारे ः ह.भ.प. बापू महाराज देवतरसे

जामखेड/प्रतिनिधी ः संपूर्ण देशभरात महात्मा गांधींच्या जयंतीच्या एक दिवस आधी एक तास स्वच्छेता उपक्रम राबविण्यात येत आहे. यामागचा उद्देश म्हणजे स्वच्छतेचे महत्व प्रतिबिंबित करण्याचा हा प्रयत्न असला तरी, जामखेड शहरामध्ये मात्र स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. शहर अस्वच्छेच्या विळख्यात असून, याकडे मात्र राजकारणी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरतांना दिसून येत आहे.
जामखेड नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचे परिणाम म्हणजे शहरात होत असलेली नागरिकांची त्रेधातिरपीट. शहरात सर्व मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मात्र नागरी सुविधांचा बोजवारा उघड्या डोळ्यांनी पाहणार्‍या राजकारणी आणि अधिकार्‍यांना लाज कशी वाटत नाही? अशा तीव्र शब्दांत सामन्य नागरिक दोन्ही आमदार व आधिकार्‍यांबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यांसह शहरातील विविध भागातील गटारी तुंबून भरल्याने पाणी रस्त्यावर आले, तर अनेक भागात लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. नागरिकांना रस्त्यावर नीट चालावे की उड्या माराव्यात सुचतच नाही. एवढी दयनीय अवस्था झाली आहे. साचलेल्या डबक्यातून निर्माण होणार्‍या डासांची उत्पत्ती, वातावरणातील बदल यामुळे साथीच्या आजारांचे व तापेचे हजारों रुग्ण शासकीय, खाजगी रुग्णालयात चकरा मारत आहेत. अस्वच्छते मुळे डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. असा प्रश्‍न उपस्थित होतो. साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. त्यातच वाढलेले गवत, मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांचा घाणीच्या ठिकाणी वाढता वावर संसर्गजन्य आजार वाढवण्यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुख्याधिकारी साहेबांनी एकदातरी शहर पाहावं…- शहरात पावसाळ्यापूर्वीच्या कोणत्याही उपाययोजना केल्याचे स्पष्ट दिसत नाही. शहरात आगोदरच नाल्यांची, रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. रोजचे सांडपाणी व पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. सध्या पावसामुळे शहरातील कोणत्याही रस्त्यावरून जाता येता नागरिकांच्या तोंडातून नगरपरिषदसाठी शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. महिला व वयोवृद्ध व्यक्तींना शहरातील रस्त्यांवर चालता येत नाही ते भरभरून आशीर्वाद देत आहेत. मुख्याधिकारी एवढे कठे व्यस्त, आहेत कळत नाही. मुख्याधिकार्‍यांनी एकदातरी पूर्ण शहर पहावे, नागरिक कोणकोणत्या समस्यांसह जीवन जगत आहेत हे एकदातरी मुख्याधिकार्‍यांनी पाहिले पाहिजे. अशा वातावरणात नाल्यांवर बीसी पावडर, धुराळणी होत आहे, ते पूर्णपणे तकलादू आहे. याकडे मुख्याधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
————————————-

प्रशासकाला जाब कोण विचारणार ? – स्वच्छ शहर सुंदर शहर अशी टिमकी नगरपालिका वाजवते. याबाबत शहरात किती विरोधाभास आहे. नागरिकांना, पुढारी व अधिकारी यांना चांगले माहित आहे. सत्ताधार्‍यांची चुक नसली तरी तरी आलटून-पालटून सत्ता भोगली आहे. नागरिकांना मुख्याधिकारी याचीच नीट ओळख नाही. प्रशासक तर फक्त सह्याचेच काम करतात. नागरिकांचे काम दूरच समस्या सांगायलाही भेटत नाहीत. शहरातील बोजवारा उडालेल्या सुविधांबाबत मुख्याधिकारी व प्रशासकाला जाब विचारायला कोणत्याही राजकीय, सामाजिक नेतृत्वाची हिम्मत होतांना दिसत नाही.

COMMENTS