बीड प्रतिनिधी - इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर जमियत उलमा ए हिंद च्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर य
बीड प्रतिनिधी – इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर जमियत उलमा ए हिंद च्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन सामाजिक सौहार्द चांगले राहावे, कोणत्याही परिस्थितीत समाजामध्ये जातीयवादी प्रश्न निर्माण होऊ नये, रोजेदारांना त्रास होऊ नये, रमजान ईद फक्त मुस्लिम समाजालाच नाही तर प्रत्येक समाजाला गुण्यागोविंदाने साजरी करता यावी असे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना म्हटले असता नंदकुमार ठाकूर म्हणाले की, निश्चितच शांततेने व आनंदाने ईद साजरी करता येईल. कोणत्याही परिस्थितीत समाजविघातक शक्तींना डोके वर काढू दिले जाणार नाही असे शब्द देऊन आश्वस्त केले. यावेळी जमियत उलमा ए हिंदचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी, बीड जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला, सचिव साबिर रशीदी, सय्यद नाजेम अजीमोदिन, जिल्हा संघटक मुज्तबा खान, सह संघटक काजी मुजिबूर्रहमान, सिद्दिकी मुदस्सिर, शेख साजेद, मौलाना वसीम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नुकतेच औरंगाबाद शहरासह काही ठिकाणी समाज विघातक शक्तींनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करून रामनवमी व रमजान या सणांना गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. याचे लोन राज्यात इतर ठिकाणी पोहोचू नये. याकरिता जमियत उलमा ए हिंदचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची विशेष भेट घेऊन याविषयी म्हणणे मांडले व इतर ठिकाणी घडलेल्या घटनांचे पडसाद बीड जिल्ह्यात अशा प्रकारे उमटू नये अशी विनंती केली असता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, कोणत्याही परिस्थितीत समाजविघातक शक्तींना डोके वर काढू दिले जाणार नाही. जिल्ह्यात शांतता व सौहार्द अबाधित ठेवण्यात येईल. तरीही जर कोणत्याही समाजकंटकाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, समाजात तेढ निर्माण करून दुही माजविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायद्याशी खेळणार्याची गय केली जाणार नाही असे शिष्टमंडळाला आश्वस्त केले. यावेळी मौलाना नदीम सिद्दिकी, मुफ्ती अब्दुल्ला, साबिर रशीदी, सय्यद नाजेम अजीमोदिन, मुज्तबा खान, काजी मुजिबूर्रहमान, सिद्दिकी मुदस्सिर, शेख साजेद, मौलाना वसीम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अफवांवर विश्वास ठेवू नका – मौलाना नदीम सिद्दिकी
याविषयी बोलताना जमियत उलमा ए हिंदचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी म्हणाले की, सर्व समाजातील लोकांनी आपल्या कामाशी काम ठेवावे तसेच कोणत्याही आणि कुठल्याही प्रकारची अफवा ऐकल्यावर त्यावर विश्वास करू नये. जर कोणी काही विघातक कृत्य करीत असेल तर थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून शहरातील व जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये याकरिता दक्षता बाळगावी असे आवाहन केले.
COMMENTS