अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लांबवणार्या तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आव
अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लांबवणार्या तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गेवराई पोलिसांना यश आले आहे.गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथून एका दरोडेखोराला तर गेवराई शहरातील संजयनगर परिसरातून दुसऱ्यास अटक केली. दोन्ही आरोपींना शनिवारी सकाळी गोंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील आरोपी मुकिम उर्फ मुस्ताफ कासम राहणार गेवराई जिल्हा बीड व त्याचा दुसरा साथीदार संदीप बबन सोळंके राहणार माजलगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील तीन कोटी ४२ लाख १७ हजार ७०० रुपयांचे संपूर्ण ६ किलो नऊशे ग्राम सोने आणि नऊ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले आहेत. उर्वरित १४ लाख ३७ हजार ९६० रुपयांसह तिसरा आरोपी फरार असून त्यास लवकर ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिले यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,एपीआय दीपक लंके,गजानन कौलासे आदींची उपस्थिती होती. दरोड्याचा अवघ्या ३६ तासात छडा लावल्यामुळे जालना पोलीस दलाचे व गेवराई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
COMMENTS