Homeताज्या बातम्यादेश

लाल किल्ला स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा हात

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून पाकिस्तानचा सहभाग उघडनवी दिल्ली : राजधानीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटप्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवा

‘एलबीटी’तून मिळणार्‍या महसूलाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
मयत खातेदारांच्या वारसांना मिळणार बँकाकडून ठेवींसह गुंतवणूकीचा परतावा
जे आज मोठं मोठ्या सभा करतायत त्यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे सभेतून सांगितले पाहिजे – खासदार श्रीकांत शिंदे 

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून पाकिस्तानचा सहभाग उघड
नवी दिल्ली : राजधानीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटप्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी निरीक्षण पथकाच्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका सदस्य देशाने दिलेल्या गुप्त माहितीनुसार, ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.
9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता. ऐतिहासिक आणि प्रतीकात्मक महत्त्व असलेल्या लाल किल्ल्याला लक्ष्य करण्यात आल्याने या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. संबंधित सदस्य राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात संघटनेच्या बदलत्या कार्यपद्धतीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याने ‘जमात-उल-मुमिनात’ नावाच्या स्वतंत्र महिला शाखेची स्थापना जाहीर केल्याचा उल्लेख आहे. या शाखेचा उद्देश संघटनेच्या कारवायांना पाठबळ देणे आणि नव्या प्रकारे भरती वाढवणे असा असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. यावरून संघटना पारंपरिक पद्धतींबरोबरच नव्या रणनीतींचाही अवलंब करत असल्याचे संकेत मिळतात.
संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण पथकाने इशारा दिला आहे की, सातत्याने सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांनंतरही काही संघटना स्वतःचे पुनर्रचना करून उच्च-प्रभावी आणि प्रतीकात्मक लक्ष्यांवर हल्ले करण्याची क्षमता राखून आहेत. त्यामुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोर आव्हान कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, काही सदस्य राष्ट्रांच्या मते जैश-ए-मोहम्मद अजूनही सक्रिय आणि संघटित स्वरूपात कार्यरत आहे. मात्र, एका अन्य देशाने ती संघटना निष्क्रिय झाल्याचा दावा केला आहे. या परस्परविरोधी आकलनांमुळे गुप्तचर माहिती आणि प्रत्यक्ष कारवाईत विसंगती निर्माण होत असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. परिणामी, दक्षिण आशियातील दहशतवादविरोधी प्रयत्न अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत.

COMMENTS