Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयभवानी ऊसाला 2700 रू पेक्षा जास्तीचा भाव देईल-अमरसिंह पंडित

जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न

गेवराई प्रतिनिधी - चालू हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागणार आहे, कर्जाचे व्याजही आधीक दराने द्यावे लागणार आहे, अ

शारदा प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी गरजुंनी नोंदणी करावी-अमरसिंह पंडित
ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार करू-अमरसिंह पंडित
धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्री पदाचा लाभ सामान्य शेतकर्‍यांना मिळेल-अमरसिंह पंडित

गेवराई प्रतिनिधी – चालू हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागणार आहे, कर्जाचे व्याजही आधीक दराने द्यावे लागणार आहे, अशा प्रतिकुल परिस्थितीत योग्य नियोजन करुन आपण गळीत हंगाम सुरु करत आहोत. अडचणीचा काळ असला तरी जय भवानी ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे नियोजन करणार आहे, या हंगामात ऊसाला प्रती टन 2700/- रुपयाच्या पुढेच भाव असेल असा विश्‍वास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या 41 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दि.16 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव दादा पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित संपन्न झाला.

प्रारंभी महादेव महाराज चाकरवाडीकर आणि जेष्ठ संचालक नारायणराव नवले यांच्या शुभहस्ते विधीवत पुजन करण्यात आले. आपल्या शुभाशीर्वादपर भाषणात ह. भ. प. महादेव महाराज यांनी कारखान्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, शिवछत्र परिवार पुण्यवान आहे. शिवाजीराव दादांनी वारकरी सांप्रदायाचा आदर केला, सदाचार, सेवाभाव जपला. दादांनी गोरगरीबांसाठी काम केले. सर्वांना सोबत घेऊन ’ एकमेका सहकार्य करु अवघे धरु सुपंथ ’ या भावनेतून जयभवानी कारखाना उभारुन शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. जयभवानी कारखाना हा गेवराई तालुका आणि परिसरातील शेतकर्‍यांसाठी कामधेनू असून जय भवानीची प्रगती असेच उत्तरोत्तर होत जाईल यासाठी सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक आहे. संपूर्ण जगामध्ये जय भवानीच्या साखरेची गोडी पोहोचेल असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, यंदाचा हंगाम मोठा अडचणीचा आहे. मराठवाडा विभागात दुष्काळाच्या झळा आहेत. अशा परिस्थितीत हंगाम चालू करण्याचे नियोजन करत आहोत.

कर्जावर 14% व्याज भरतोय, राज्य सरकारच्या सहकार्याने कमी व्याजदराने कर्ज घेऊन व्याजाची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात साखरेचे भाव वाढतील, पर्यायाने उसाचे दर ही समाधानकारक असतील. गेल्या सहा वर्षात कर्मचार्‍यांचा पगार कथी थकवला नाही, कर्मचार्‍यांच्या विश्‍वासामुळे कारखाना नावारुपाला आला. अजूनही कांही जुने जाणते कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांच्या निष्ठा कारखानाच्याच्या दारी आहेत. संचालक मंडळ आणि व्यवस्थापन यांच्या नियोजनबद्ध कामामुळे आपण आता स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षम झालो आहोत. जायकवाडीच्या पाण्याची क्षमता वाढण्यासाठी प्रयत्न करणार असून उत्तर महाराष्ट्रातील धरणाचे पाणी आणून पाणी पातळीतील तूट भरुन काढू, पाणी पातळी खाली जात आहेत. त्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सिंदफना खो-याती आठ बॅरेज झाले तर साधारण 60 ते65 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. यातून चार महिने हंगाम करु शकलो तर दहा लाख टन गाळप आपण करु असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तालुक्याचे लोकप्रतिनिधी पाण्यावर बोलत नाहीत, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बोलत नाहीत, मात्र शिवछत्र परिवारावर मात्र ते बोलतात, त्यांना बोलायला दुसरा विषयच नसतो असा टोला त्यांनी लगावला. शेतकर्‍यांना आता एकीने रहावे लागेल, मताचे मुल्य आता ठरवावे लागेल तर विरोधक वटणीवर येतील असेही ते म्हणाले. जयभवानीची क्षमता आता पर्यंत 2500 हून 5500 मेट्रिक टन पर्यंत वाढविली. शेतकरी, कर्मचारी, व्यवस्थापण यांनी सहकार्य आणि जिद्द ठेवली तर आपण ही क्षमता 8500 पर्यंत घेऊन जाऊ.

भविष्याचा विचार करून आता आपल्याला साखरेबरोबरच इतर उपपदार्थ उत्पादनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. डिसलरी, इथेनॉल आणि सीएनजी कडे आपण आता लक्ष देत आहोत, त्यामुळे या उत्पादनातून कारखान्याचा फायदा वाढणार आहे. सभासद शेतकरी बांधवाचाही फायदा होणार आहे. यावर्षीही जास्तीत जास्त भाव देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून हा भाव निश्‍चितच 2700 रुपयांच्या वर असेल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कारखान्याच्या मागील गळीत हंगामातील कामगिरीचा आढावा घेऊन चालू हंगामाचे नियोजन सांगितले. बॉयलरचे काम वेळेत पुर्ण केल्याबद्दल अंगद पवार यांचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी मानले. याप्रसंगी जयभवानीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह संचालक सर्वश्री आप्पासाहेब गव्हाणे, सुनिल पाटील, श्रीराम अरगडे, राजेंद्र वारंगे, डॉ. आसाराम मराठे, संदीपान दातखीळ, जगन्नाथ दिवाण, कुमारराव ढाकणे, शरद चव्हाण, भिमराव मोरे, रावसाहेब देशमुख, शंकर बप्पा तौर, गणपत नाटकर, जगन्नाथ काळे, बाबुराव काकडे, रहेमतुल्ला पठाण, नंदकिशोर गोर्डे, साहेबराव चव्हाण यांच्यासह माजी सभापती बाबुराव जाधव, साहेबराव पांढरे, पांडुरंग गाडे, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, नगरसेवक शाम येवले, दिलीपशेठ गंगवाल, शांतीलाल पिसाळ, बळीराम रसाळ, शैलेश तौर, समिम पटेल, अंगद ढाकणे यांच्यासह शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, चीफ इंजीनियर अशोक होके, ऋषिकेश देशमुख, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, परचेस ऑफिसर सोळुंके, संगणक प्रमुख धनाजी भोसले, डिस्टीलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, सुरक्षा अधिकारी एस एन औटे, सह. कार्यालयीन अधिक्षक गोविंद चव्हाण, हेड टाईम किपर सचिन उधे यासह सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख, पदाधिकारी, ऊस बागायतदार, ऊस तोडणी ठेकेदार, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS