Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामगाराच्या वारसाना जयभवानीची मदत

अमरसिंह पंडित यांच्या हस्ते मदतीचे वाटप

गेवराई प्रतिनिधी - जयभवानी सहकारी साखर कारखाना येथील उस वाहतुक कामगाराच्या वारसांना तसेच ज्यांच्या जनावरांची हनी झाली आहे त्या कामगारांना जयभवान

साडेचार वर्षीय वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या
ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात ?
पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल – मुख्यमंत्री शिंदे

गेवराई प्रतिनिधी – जयभवानी सहकारी साखर कारखाना येथील उस वाहतुक कामगाराच्या वारसांना तसेच ज्यांच्या जनावरांची हनी झाली आहे त्या कामगारांना जयभवानी कारखान्याच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असून कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या हस्ते त्यांना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
गेवराई तालुक्याची  आर्थिक वाहिनी असलेल्या जयभवानी कारखान्याचे उस उत्पादक शेतकर्‍यां बरोबर उस वाहतूक करणार्‍या कामगारांची काळजी घेतली आहे. अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी सहकारी साखर कारखान्याने 2022-23 या चालू गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी व वाहतूक करणार्‍या कामगारांचा  विमा उतरवलेला होता. दुर्दैवाने झालेल्या विविध अपघातामध्ये ऊस वाहतूक करणार्‍या लक्ष्मीबाई ससाणे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे वारस सुनिल ससाणे यांना 3 लाख रुपयांचा धनादेश चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. उस वाहतूक करणार्‍या राजेंद्र चाबुकस्वार, मचिंद्र बोर्डे, ताराचंद शेजुळ यांचे बैल मृत पावले होते त्यांना प्रत्येकी 37590/- रु. प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले. बंडू वारुळे, सुनिल गिते आणि अशोक देवकते यांचेही बैल अपघातामध्ये मृत पावले त्यांनाही प्रत्येकी 18750/- रु. प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, मुख्यशेतकी अधिकारी  जगन्नाथ शिंदे, सौरभ कुलकर्णी, सुदाम पघळ, कुटे, महेश गुंजाळ आदी उपस्थित होते.

COMMENTS