पंचवटी - फुलेनगर परिसरातील गौडवाडी येथील आवास योजनेतील एका घरकुलाचे स्लॅब कोसळून बहीण भाऊ जखमी झाल्याची घटना घडली होती. या आवास योजनेतील घरकुल प
पंचवटी – फुलेनगर परिसरातील गौडवाडी येथील आवास योजनेतील एका घरकुलाचे स्लॅब कोसळून बहीण भाऊ जखमी झाल्याची घटना घडली होती. या आवास योजनेतील घरकुल पुनर्विकसित करावे , या मागणीसाठी जय भीम ब्रिगेडने बुधवार (ता.०३ पासून )गौडगाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला यश मिळाले असून, सदर घरकुल आवास योजनेचे स्ट्राचरल ऑडिट झाले आहेत. ज्यां घरकुलाचे अवस्था दयनीय झाली आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाशिक महानगरपालिका हद्दीतील फुलेनगर परिसरात गेल्या तीस ते पस्तीस वर्षा पूर्वी गौडवाडी येथील आवास योजना राबविण्यात आली होती. वेळोवेळी दुरुस्ती व डागडूजी न केल्याने सदर घरकुल मोडकळीस आली आहेत. दोन वर्षापूर्वी इमारतीचा एक भाग कोसळुन लहान मुले त्या मलब्याखाली दबले गेले होते. त्यावेळी मुले व महिला जखमी झालेले होते.सुदैवाने जिवितहानी झालेली नव्हती. तशीच पुनरावृत्ती पुन्हा होऊन सोमवारी ( ता.०१) रात्रीच्या सुमारास छताचा स्लॅब कोसळून बहीण भाऊ जखमी झालेले आहेत. या आवास योजनेतील रहिवाशांसाठी नवीन घरकुल योजना राबविण्यात यावी, जो पर्यंत घरे मिळत नाही तो पावेतो राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी जय भीम ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रतिक कर्डक यांनी निवेदाद्वारे केली होती. तसेच प्रशासनाला जाग या करीता गौडवाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बुधवार ता.०३ रोजी पासून धरणे आंदोलन सुरू केले होते, हे तीन दिवस चालले. शुक्रवार ता.५ रोजी पंचवटी विभागीय कार्यालयाची विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी गौंडवाडीतील घरकुलांना भेट देत पाहणी केली. , जागे अभावी ज्या घरकूलाचे अवस्था दयनिय असलेल्या अश्या १३ कुटुंबांनाच सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे. तसेच या घरकुल आवास योजनेतील संकुलाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानंतर जय भीम ब्रिगेड महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष अँड प्रतिक कर्डक यांनी गौड वाडीतील पंच मंडळ यांच्या समवेत चर्चा करून सद्यस्थितीत आंदोलन स्थगित केले आहे.सदर आंदोलन यशस्वी करणाऱ्यांमध्ये जय भीम ब्रिगेडचे शाम भोईके, संजय कानाके, शाम तोडसांम, रणजित भोईके,, संजय कन्नाके, शेखर जामकर योगेश गावित, ललित पागे , धरम शिंदे, मोहन तांबे, लक्ष्मण शिंदे, नाना शिंदे , विशाल तांबे, सुदीप निकम, अजय निकम प्रशांत निकम ,रवींद्र वाघ, अमित भोसले, मुकेश झनके,, निशा झणके, प्रकाश खिच्ची, कृष्णा भोंड अनिता कातारी, विनायक गायकवाड , शशिकांत वाघमारे, व पेठ रोड फुले नगर परिसरातील अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते.
अन्यथा मोठे जनआंदोलन – गौंडवाडीतील जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या कुटुंबाना योग्य स्थळी हलविण्यात यावे. तसेच या ठिकाणी २४७ कुटुंब जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. त्यांना शासनाच्या निधीतून नवीन घरकुल बांधून द्यावी. नवीन घरकुल बांधून होई पावेतो या कुटुंबांना पर्यायी व्यवस्था करावी. गोरगरीब जनतेला लवकरात लवकर न्याय द्यावा. सदर बाबीकडे दुर्लक्ष न करता तात्काळ मार्गी लावावी, असे न झाल्यास जय भीम ब्रिगेड मोठे जन आंदोलन करेल. – अँड प्रतिक कर्डक कार्याध्यक्ष, जय भीम ब्रिगेड, महाराष्ट्र
COMMENTS