Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरीजी महाराजांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार  

जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय...

नाशिक - जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत सात मतदार संघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८

सिन्नर तालुक्यात शांतिगिरीजी महाराजांचे नागरिकांनी केले उत्फुर्त स्वागत 
नाशिक ग्रामीण भागात शांतिगिरीजी महाराजांचा झंझावती प्रचार दौरा 
परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा जय बाबाजी परिवाराचा निर्धार 

नाशिक – जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत सात मतदार संघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शातिगिरीजी महाराज यांना देशभक्तीसाठी, राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.

सध्याचे राजकारण पहाता संतांच्या खांद्‌यावर राष्ट्रनिर्मिती ची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. या विज्ञान युगातही आपली भारतीय संस्कृती किती फायदेशीर आहे, आणि तिच अनुकरण कसे पाध्छात्य देश व त्या देशातील नागरिक कुतुहलाने करतात, हे काही वर्षापासून आपण बघतो, यांचं मुख्य कारण म्हणजे आपण सर्वानी या घडीला स्विकारलेल आपलं प्रखर हिंदुत्व होय

राजकारण असो किंवा समाजकारण यात निस्वार्थ-त्याग-वैराग्यता यांचा थेट हस्तक्षेप हे याचं मुख्य कारण आहे. कारण जिथं राजकीय नेते तिथे स्वार्थ आणि जिथ संत तिथे विश्वास सध्या हेच समीकरण सर्व सामान्य माणसाच्या मनात रुजले आहे आणि हे तितकेच खरे आहे. येत्या काही दिवसांत २०२४ ची निवडणूक रणसंग्राम भरणार आहे आपला पिढीजात धंदा असल्यासारखे राजकीय नेते तयारीला लागले आहेत यात देशसेवेचा भाव दिसेनासा झाला आहे. आजचे राजकारण कंटाळवाणे वाटत असतांना राजकारणाच्या शुद्धीकरणाची एक आनंदाची बातमी समाजाला देण्यासाठी राज्यभरातील जय बाबाजी भक्त परिवाराच्या झालेल्या बैठकीत निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री.श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना निवडणुकी लोकसभा निवडणूकित उतरविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. बाबाजींना निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला असून राज्यभरातील भाविक प्रचार करण्यासाठी नाशिकला दाखल होणार आहे बाबाजींनी देखील भक्तपरीवाराच्या आग्रहाखातर व काळाची गरज म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मान्यता दिली आहे जय बाबाजी भक्त परिवार छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, जालना दिडोरी, अहिल्या नगर आदी सात लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत देखील निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी होणार आहे. निवडणुकीसाठी भक्त परिवार नियोजनबद्धरित्या कामाला देखील लागला आहेत खर तर बाबांची ही उमेदवारी राजकारणाला कलाटणी देणारी आहे. कारण दरवर्षी एक मंत्री जे काम करु शकत नाही असे दर्जेदार समाजहिताचे धर्महिताचे, देशहिताचे कार्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज दरवर्षी कुठलीही सत्ता अथवा पद नसताना करत असतात आजचे बालक उद्‌द्याचे राष्ट्र‌चालक यादृष्टीने बालसंस्कार व्यसमुक्त समाज व महिला सक्षमीकरण यासाठी परिश्रमपूर्वक भरीव कार्य सुरु आहे सत्तेचं बळ मिळाल्यास महाराज अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवतील हे मात्र नक्की.

आजपर्यतचा इतिहास आहे की या भारतभुमिच्या सर्व तत्वांचं रक्षण हे संतांनीच केले आहे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उत्तरल्याने चिखल झालेल्या राजकारणात पुन्हा देव-देश-धर्म हिलाच्या कार्याचा सुगंध दरवळेल हे मात्र नक्की

COMMENTS