अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेने लवकरात लवकर शहरातील ओढे-नाले खुले करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. सावेडीतील
अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेने लवकरात लवकर शहरातील ओढे-नाले खुले करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. सावेडीतील गावडे मळा परिसरातील समस्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बुरुडे, बाळासाहेब बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण आदी उपस्थित होते.
शहरातील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते व ते पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते व आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. परिसरातील रस्त्यांची दुरावस्था होते, असे सांगून ते म्हणाले, गावडे मळा परिसरामध्ये ओढे-नाले बुजवून बंद पाईप गटारी तयार केल्या असल्यामुळे पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहून जात नाही व ते पाणी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये आल्यावर नागरिकांना मोठ्या त्रासला सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर शहरातील ओढे-नाले खुले करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अंकुश चत्तर, रंजना उकिर्डे,सचिन जगताप, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजिनीयर मनोज पारखी, अमित बुरा, परेश खराडे, रामदास जरांगे, विष्णू सब्बन, नितीन धुमाळ, दत्तात्रय झगडे, राजू बोराडे, संतोष गावडे, दर्शन हिवाळे, तेजस वाबळे, सुरेखा भांड आदी उपस्थित होते.
COMMENTS