देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ःअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या उभ्या पीकांचे सरसकट पंचनामे करा. फक्त उभ्या पीकांचे पंचनामे करण्याचे धोरण लवच

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ःअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या उभ्या पीकांचे सरसकट पंचनामे करा. फक्त उभ्या पीकांचे पंचनामे करण्याचे धोरण लवचिक करा. कांदा काढून शेतात वाळण्यासाठी पोळी लावल्या, त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला. शुक्रवारी दिनांक 12 मे रोजी सायंकाळी शेकडो शेतकर्यांसह आमदार तनपुरे यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निवेदन दिले.
आमदार तनपुरे म्हणाले कि, तालुक्यात मागील महिन्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी, गारपीट, वादळ झाले. पीकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः कांदा उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचे फक्त उभ्या पीकाचे पंचनामे करण्याचे आदेश झाले. वास्तविक, सध्या उभी पीके अवघे दोन-तीन टक्के आहेत. शेतात काढलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे होत नाहीत. असे निदर्शनास आले आहे. त्याचे पंचनामे झाले पाहिजे. मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पीकांच्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत अद्याप मिळाली नाही. अतिवृष्टीच्या अनुदानासाठी फक्त राहुरी महसूल मंडळ पात्र ठरल्याचे सांगितले जाते. त्यातही 40 टक्के शेतकर्यांनाच मदत मिळाली आहे. घोषणा होतात. शेतकर्यांच्या हाती काहीच पडत नाही. शेतकर्यांबद्दल संवेदनशील व गतिमान नसलेले शासन पाहायला मिळत आहे. असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शेतकरी विठ्ठल मोकाटे, पंढरीनाथ पवार, भारत तारडे, विजय डौले, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, मधुकर पवार, बाळासाहेब खुळे, चंद्रकांत पानसंबळ, सुयोग नालकर, विलास शिरसाट, किरण गव्हाणे, ओंकार कासार, राजेंद्र बोरकर, संतोष आघाव, पांडू उदावंत, दिनकर पवार, डॉ. राजेंद्र बानकर उपस्थित होते.
COMMENTS