Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुजार्‍यानेच महिलेचा कपडे बदलतानाचा केला व्हिडिओ

पुणे ः कोलकाता, बदलापूर येथील घटना ताज्या असतांनाच पुण्यात एका पुजार्‍याने पूजेसाठी आलेल्या एका महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ तयार केल्याची संता

विधानपरिषदेवरून काँगे्रस-ठाकरे गटात जुंपली
ग्रहमान फिरले सांगून उपायाच्या बहाण्याचे मुलीचा विनयभंग
सिव्हिल हडको येथील घरफोडीत दागिन्यांची चोरी

पुणे ः कोलकाता, बदलापूर येथील घटना ताज्या असतांनाच पुण्यात एका पुजार्‍याने पूजेसाठी आलेल्या एका महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक घटना हवेली तालुक्यातील तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हवेली तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे पूजा करण्यासाठी एक दाम्पत्य आले होते. त्यावेळी नदीत आंघोळ करुन आल्यानंतर पुजेच्या खोलीत महिला कपडे बदलण्यास गेली असता, त्याठिकाणी तिला पुजार्‍याच्या बॅगेजवळ एक मोबाईल दिसला. पुजार्‍याने महिलेचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी तो मोबाईल तिथे जाणीवपूर्वक ठेवल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी 29 वर्षीय पिडित महिलेने सदर पुजार्‍याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात पुजारी अमोल विजय टोनगावकर (वय-26,रा. वाघोली, पुणे) याच्यावर भान्यास कलम 77 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला ही तिचे पती, मुली व दिर यांच्यासोबत अमोल पंडित यांच्या सांगण्यावरुन त्रिवेणी संगम, तुळापूर या ठिकाणी गेली होती. तक्रारदार व तिच्या पतीला पुजा झाल्यानंतर नदीत आंघोळ करुन आल्यावर पुजार्‍याने तिला पुजेच्या रुममध्ये कपडे बदलण्यास सांगितले. सदर खोलीत महिला कपडे काढत असताना तिला भिंतीच्या कोपर्‍यात असलेल्या पंडितजींच्या बॅगेशेजारी उभा ठेवलेला एक मोबाईल फोन दिसला. त्यामुळे तिने सदर मोबाईल हातात घेऊन पहिला असता, तो मोबाईल फोन पंडीत अमोल टोनगावकर यांचा असल्याचे तिला समजले. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असल्याची खात्री सदर महिलेला पटली. आरोपीने आपले नग्न अवस्थेतील चित्रीकरण करण्यासाठी आपला मोबाईल तिथे ठेवल्याचे तिच्या लक्षात आले. यामुळे त्याने त्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS