Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईनेच पोटच्या मुलीचा घेतला जीव

पुणे/प्रतिनिधी ः पोटच्या चार वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय 4) असे खून झा

हॉकी टीम इंडिया सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन
तरुणांनी गांधीजींच्या विचाराने भारताच्या समृध्द प्रगतीसाठी योगदान द्यावे – श्री.थानेदार  
कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागणार परिक्षा

पुणे/प्रतिनिधी ः पोटच्या चार वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय 4) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री ( ता. 27) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे ही घटना घडली. आईने एवढ्या निर्घृणपणे मुलीचा खून का केला?, हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पना ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. 23 दिवसापूर्वी हे कुटुंबीय तेथे राहण्यास आले होते. महिला बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. कल्पना सोमवारी भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. शेजारच्यांनी तिला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, दरवाजा उघडला नाही. घरमालक व शेजार्‍यांनी आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला व ससून रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनेचा पंचनामा करत आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलिस आरोपी महिलेस मंगळवारी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी पुढील चौकशीसाठी करणार आहेत. मुलीच्या हत्येमागे नेमके कोणते कारण होते? आईने मुलीचा खून का केला? याचा अद्याप उलगडा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

COMMENTS