Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. अजितदादांनीच नीलेश लंकेंना संधी दिली

सभापती रासकर; पारनेर बाजार समितीत शोकसभा  पारनेर : पवार कुटुंबामुळे पारनेर तालुक्याला राजकीय ओळख मिळाली. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील नीलेश लंके यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन आमदार करण्याचे धाडस स्वर्गीय अजितदादा पवार यांनीच केले. पुढे पवार साहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत खासदार केले. त्यामुळे नीलेश लंके यांच्या जीवनातील पवार कुटुंबाचे योगदान अतुलनीय आहे, असे स्पष्ट मत पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्येष्ठ नेते किसनराव रासकर यांनी व्यक्त केले.  स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवारी (दि. १)   पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सभास्थळी शोकाकुल वातावरण होते.  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे म्हणाले,  स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान माझ्या जीवनात फार मोठे आहे. त्यांच्या विचारांवरच मी राजकारण आणि समाजकारण करतो. त्यांच्या पाठबळामुळे मला तालुकाध्यक्षपदाची दोन वेळा संधी आणि बाजार समितीच्या सभापतीपदावर काम करण्याचा मान मिळाला.सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता पुन्हा होणे नाही.  या शोकसभेला खासदार नीलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, माजी सभापती सुदाम पवार, गंगाराम बेलकर, बाबासाहेब तरटे, उपसभापती किसन सुपेकर, अर्जुन भालेकर, उद्योजक श्रीरंग रोकडे, डॉ. बाळासाहेब कावरे, किरण ठुबे, सचिन पठारे, मारुती रेपाळे, बापूसाहेब शिर्के, काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, बाजार समिती संचालक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार लंके भाऊक  ! अजित पवार यांच्या निधनानंतर पारनेर येथील शोकसभेत खासदार नीलेश लंके यांनी अवघ्या वीस सेकंदांत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून श्रद्धांजली अर्पण केली. या क्षणातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि निलेश लंके यांचे अतूट नाते किती जिव्हाळ्याचे होते, हे उपस्थितांच्या मनात ठसले. अजितदादा गेल्याने निलेश लंके यांच्या डोक्यावरचा आधाराचा हात गेला, अशी भावना सर्वसामान्य जनतेत व्यक्त होत आहे.

शिरूरच्या खासदारांची धरसोड भूमिका
राष्ट्रवादीची दोलायमानता !
येडेश्वरी कारखाना परिसरात अजित दादांचे भव्य स्मारक उभारणार

सभापती रासकर; पारनेर बाजार समितीत शोकसभा 

पारनेर : पवार कुटुंबामुळे पारनेर तालुक्याला राजकीय ओळख मिळाली. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील नीलेश लंके यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन आमदार करण्याचे धाडस स्वर्गीय अजितदादा पवार यांनीच केले. पुढे पवार साहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत खासदार केले. त्यामुळे नीलेश लंके यांच्या जीवनातील पवार कुटुंबाचे योगदान अतुलनीय आहे, असे स्पष्ट मत पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्येष्ठ नेते किसनराव रासकर यांनी व्यक्त केले.

 स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवारी (दि. १)   पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सभास्थळी शोकाकुल वातावरण होते.

 राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे म्हणाले,  स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान माझ्या जीवनात फार मोठे आहे. त्यांच्या विचारांवरच मी राजकारण आणि समाजकारण करतो. त्यांच्या पाठबळामुळे मला तालुकाध्यक्षपदाची दोन वेळा संधी आणि बाजार समितीच्या सभापतीपदावर काम करण्याचा मान मिळाला.सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता पुन्हा होणे नाही.

 या शोकसभेला खासदार नीलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, माजी सभापती सुदाम पवार, गंगाराम बेलकर, बाबासाहेब तरटे, उपसभापती किसन सुपेकर, अर्जुन भालेकर, उद्योजक श्रीरंग रोकडे, डॉ. बाळासाहेब कावरे, किरण ठुबे, सचिन पठारे, मारुती रेपाळे, बापूसाहेब शिर्के, काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, बाजार समिती संचालक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार लंके भाऊक  !

अजित पवार यांच्या निधनानंतर पारनेर येथील शोकसभेत खासदार नीलेश लंके यांनी अवघ्या वीस सेकंदांत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून श्रद्धांजली अर्पण केली. या क्षणातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि निलेश लंके यांचे अतूट नाते किती जिव्हाळ्याचे होते, हे उपस्थितांच्या मनात ठसले. अजितदादा गेल्याने निलेश लंके यांच्या डोक्यावरचा आधाराचा हात गेला, अशी भावना सर्वसामान्य जनतेत व्यक्त होत आहे.

COMMENTS