Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने झोडपले

अनेक जिल्ह्यात फळबागांचे नुकसान

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात शुक्रवारी अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भ, पश्‍चिम महारा

न्यूझीलंडला ‘गिल’ वादळाचा तडाखा
भाजपशी युती हाच शेवटचा पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात शुक्रवारी अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे फळबागांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. कोल्हापूर, सातारा, धुळयासह कोकणात पावसाने चांगलीच हजेरी लावली.  आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूसह जाभुळ पिकाला फटका बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी आलेल्या पावसाने काहीसा गारवा मिळाला, पण आजरा शहरातील आठवडी बाजारावर पाणी फेरले. दरम्यान, तालुक्यातील हत्तीवडे वीज पडून वीटभट्टीवर काम करणारी मजूर महिला जखमी झाली. अनसाबाई श्रीकांत चव्हाण (वय 36, मुळगाव अलिबाद, जि. विजापूर कर्नाटक) असे जखमी महिलेचे नाव आहे.दुपारी तीनच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजेचा कडकडाट व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने आजर्याचा आठवडा बाजार ही दुपारीच संपला. वार्‍यामुळे पिकलेल्या काजूसह ओला काजू व मोहोरही पडला आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्‍वर पाठोपाठ सातारा, मेढा, जावली या भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात पावसासह गारपीट झाली. जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पुलगाव परिसरात काही ठिकाणी पावसादरम्यान एक ते दोन मिनिट बोराच्या आकाराची गार कोसळली. विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस वादळी वार्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आज दुपारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसामुळे पातूर आणि बाळापुरात मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने संत्रा, भाजीपाला, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पातूर तालूक्यातील बेलूरा गावातील नाल्याला ऐन उन्हाळ्यात पुर आला. या अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत शेतमालाचे नुकसान झाले. बाजार समितीत सध्या विकण्यासाठी आलेला हरभरा आणि गहू या पावसामुळे भिजला. अकोला बाजार समितीत माल साठविण्यासाठी शेड कमी पडत असल्याने अनेकदा पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे.

COMMENTS