Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरीर नव्हे, आत्माच खरा सुंदर! : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारतींचा परखड सामाजिक संदेश

नांदेड । प्रतिनिधीभौतिक सुखांच्या आहारी गेलेल्या आजच्या समाजाला आत्मिक मूल्यांची आठवण करून देणारा परखड संदेश ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारती यांनी

Nanded : देगलूर मध्ये ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलचे पूर्वतयारी व निर्जंतुकीकरण
नायगाव तालुक्यातील ‘कीर्ती गोल्ड’ कंपनीवर धाड
तरोडा नाका परिसरातील एटीएम फोडीचा प्रयत्न हाणून पाडला

नांदेड । प्रतिनिधी
भौतिक सुखांच्या आहारी गेलेल्या आजच्या समाजाला आत्मिक मूल्यांची आठवण करून देणारा परखड संदेश ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारती यांनी दिला. शरीर नाशिवंत आहे; आत्म्याचे सौंदर्यच माणसाला अजरामर करते. म्हणून शरीरसौंदर्यापेक्षा आत्म्याचे सौंदर्य श्रेष्ठ आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बरबडा येथे आदर्श शिक्षक शिवाजी गुरुजी शेवाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. आजची दिशाभूल करणारी जीवनशैली, मूल्यांचा होत चाललेला र्‍हास आणि संस्कारांची गरज यावर त्यांनी भाष्य केले. ज्ञानेश्वरीतील तैसा हृदयामध्ये मी रामू या ओवीचा समाजाला विसर पडत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालकांनी राजमाता जिजाऊंनी शिवरायांवर घडवलेले संस्कार आजच्या पिढीवर घडवावेत, असे आवाहन करत आत्मिक सौंदर्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शिक्षकांवर अन्याय नको शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त कामांचे ओझे टाकू नये, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी शासनाच्या निर्णयांवर टीका केली. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 4 ते 8 जानेवारीदरम्यान संगीतमय श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. गायन व वादनाने कार्यक्रमात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आत्मिक मूल्यांची जाणीव करून देणारा आणि शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा कीर्तन सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

COMMENTS