Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्यजित तांबेंना उमेदवारी न देणे ही आमची चूक – अजित पवार

पुणे ः नाशिक पदवीधरचे अपक्ष नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेची तोफ डागत अनेक गंभीर आरोप क

मनपाकडून कधी व्हायचे 213 कोटी वसुल…?थकबाकी दुर्लक्षित, पण नव्याने घरपट्टी वाढीवर मात्र प्रशासनाचा जोर
पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून | LOKNews24
अहिल्यानगर शहरातील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश

पुणे ः नाशिक पदवीधरचे अपक्ष नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेची तोफ डागत अनेक गंभीर आरोप केले आहे. सत्यजित तांबे म्हणाले होते की, मला अखेरच्या क्षणी चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी कट रचण्यात आला. आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले. बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य करुन अजित पवारांनी सत्यजित तांबेंची बाजू घेतली आहे.

बारामती येथे जाहीर सभेत शिक्षक-पदवीधर निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले. पुढे अजित पवार म्हणाले, आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदरच उल्लेख केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरुणांना संधी दिली पाहिजे. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार होता. त्यात मी लुडबूड करण्याचे काही कारण नव्हते. कारण ती जागा काँग्रेसला सुलटलेली होती. दरम्यान, काल नाना पटोले यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. अजित पवारांनीच तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणला, असे नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर म्हणजेच नाना पटोलेंवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS