कल्याण प्रतिनिधी / वक्तव्य करणं सोप्प असतं. पण प्रत्यक्षात कृती करणं अवघड असते. बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतके सोप्प काम नाही, असा खरपूस समाचार आमदा
कल्याण प्रतिनिधी / वक्तव्य करणं सोप्प असतं. पण प्रत्यक्षात कृती करणं अवघड असते. बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतके सोप्प काम नाही, असा खरपूस समाचार आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घेतला आहे. बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार , विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामतीचा पॅटर्न तयार झाला आहे.या पवार कुटुंबियांची बारामती आहे. त्यांनी सर्व समाज घटकांसाठी काम केल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी काही नेते असा केविलवाणा प्रयोग राबवत असल्याचा टोलाही लंके यांनी लगावला.

COMMENTS