Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोशल मीडियाच्या गुरफटलेल्या युवकांना संताचे कार्य  कळणे गरजेचे ;- डॉ.बंडूशेठ भांडकर

पाथर्डी प्रतिनिधी - आपला परिसर व गावाबरोबरच मानवाने विचार व अंतकरण सुद्धा स्वच्छ व शुद्ध ठेवले पाहिजे.हा संत गाडगेबाबांनी दिलेला संदेश युगान

नगर मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवून अवजड वाहतूक बंद करा
धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान
जयहिंद लोकचळवळ व कर्‍हेश्‍वर विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

पाथर्डी प्रतिनिधी – आपला परिसर व गावाबरोबरच मानवाने विचार व अंतकरण सुद्धा स्वच्छ व शुद्ध ठेवले पाहिजे.हा संत गाडगेबाबांनी दिलेला संदेश युगानयूग लागू पडणारा आहे.मानवी जीवन जगताना याचा सर्वांनी अंगीकार करावा.श्री.संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सुवर्णयुग परिवार ट्रस्ट यांच्या वतीने नवी पेठ येथील श्री सुवर्ण सिद्धी गणेश मंदिर येथे नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी उद्योजक डॉ.बंडू भांडकर बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष भागवत,मधुकर मानुरकर,रमण भंडारी,भैय्या पानगे,पालिकेचे आरोग्य विभागाचे मुकादम शिवा पवार,कुरेश पठाण,शिवा बालवे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

           पुढे बोलताना भांडकर म्हणाले की,सुवर्णयुग परिवार ने सर्व संत व महापुरुष यांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.यामुळे मोबाईल व सोशल मीडिया मध्ये गुरफटलेल्या युवक वर्गाला प्रत्येक संत-महापुरुषाचे विचार व कार्य कळेल.तसेच यामुळे काही ठिकाणी समाजसमाजामध्ये होत असलेला भेदभाव देखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.हेच तत्त्वज्ञान संत गाडगेबाबांसह सर्वच संतांनी सांगितलेले आहे.आगामी काळात देखील या उपक्रमाच्या माध्यमातून एकोपा वाढण्यास निश्चित मदत होईल.इतर सामाजिक संस्थांनी देखील असा उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे डाँ.भांडकर म्हणाले.

COMMENTS