नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आज शुक्रवारी दुपारी 2ः35 वाजता चांद्रयान-3 या उपग्रहाचे प्रेक्षपण करणार आहे. श्र
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आज शुक्रवारी दुपारी 2ः35 वाजता चांद्रयान-3 या उपग्रहाचे प्रेक्षपण करणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशनवरुन मिशन लॉन्च होईल. चंद्राच्या पुष्ठभागावर सुरक्षित लँडिंग हे इस्रोच पहिले लक्ष्य आहे. भारताने 2019 साली चांद्रयान-2 मिशन लॉन्च केले होते. पण हे मिशन यशस्वी ठरले नव्हते. आता चांद्रयान-3 मिशनमध्ये डिजाईनपासून असेंबलीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.
चांद्रयान-3 मिशनवर संपूर्ण देशाच लक्ष आहे. जगातील अनेक देशांची या मोहिमेवर नजर असणार आहे. अमेरिकेने सुद्धा म्हटले की, भारताच मून मिशन आमच्यासाठी महत्वाच आहे. चांद्रयान-3 मिशनचा डाटा आर्टिमस मिशनसाठी महत्वाचा ठरणार आहे. आर्टिमस मिशनच्या माध्यमातून अमेरिकेला पुन्हा एकदा मानवी चंद्र मोहिम करायची आहे. भारत-अमेरिकेने आर्टिमस करारावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. मिशनची सुरुवात जानेवारी 2020 मध्ये झाली होती. वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सनी स्पेसक्राफ्टची डिजाइन आणि असेंबलीवर बरीच मेहनत केलीय. मागच्या मिशनमध्ये झालेल्या चूकांमधून धडा घेतलाय. यावेळी लँडरचे पाय मजबूत बनवण्यात आले आहेत. चांद्रयान-3 मिशनला ‘लॉन्च व्हीकल मार्क 3’ रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केले जाईल. यावेळच्या मिशनमध्ये ऑर्बिटरचा समावेश नाही. स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. 14 जुलैला मिशन लॉन्च होईल. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात यान चंद्रावर पोहोचेल. स्पेसक्राफ्ट चंद्रापर्यंत पोहोचायला 45 ते 48 दिवस लागतील. 23 किंवा 24 ऑगस्टला स्पेस क्राफ्ट चंदावर लँड करेल. चांद्रयान-3 मिशनमध्ये प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर आहे. यात लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पुष्ठभागावर उतरतील. प्रोपल्शन मॉड्यूल वेगळा होईल. प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. रोव्हर चांद्रभूमीवर आपले संशोधन कार्य करणार आहे.
लँडरमध्ये फक्त चार इंजिनांचा समावेश – लँडरच्या चार कोपर्यांवर चार इंजिन (थ्रस्टर्स) असतील, गेल्या वेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय, दोन इंजिनांच्या मदतीने अंतिम लँडिंग केले जाईल, जेणेकरून दोन इंजिन आपत्कालीन परिस्थितीत काम करू शकतील. त्याचप्रमाणे यावेळी ऑर्बिटर नसून एक प्रोपल्शन मॉड्यूल असेल जे लँडर आणि रोव्हरपासून वेगळे झाल्यानंतरही चंद्राभोवती फिरेल आणि चंद्रावरून पृथ्वीवरील जीवनाची चिन्हे शोधण्याचा प्रयत्न करेल. भविष्यात, हा डेटा इतर ग्रह, उपग्रह आणि तार्यांवरील जीवनाच्या शोधात वापरला जाऊ शकतो.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरुपतीला केली पूजा – चांद्रयान-3 चे प्रक्षेपण सुरु होण्याआधी इस्रोचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 चे मिनी मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मोहीम यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली.24-25 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. पुढील 14 दिवस, रोव्हर लँडरभोवती 360 अंशात फिरेल आणि अनेक चाचण्या होतील. चंद्रावर राष्ट्रध्वज पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देशही ठरेल.
COMMENTS