इस्राइल आणि पॅलेस्टीन यामध्ये युद्धविरामाची घोषणा होऊन गेली असून आज रविवारपासून ती प्रत्यक्षात अमलात येईल अशी घोषणा इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन
इस्राइल आणि पॅलेस्टीन यामध्ये युद्धविरामाची घोषणा होऊन गेली असून आज रविवारपासून ती प्रत्यक्षात अमलात येईल अशी घोषणा इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन यांनी केली आहे. इस्रायलने ही युद्धविरामाची घोषणा एक पुस्तक म्हणून केली की न्यायाची बाजू म्हणून केली की नेमक्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दबावातून केले का आणि कशी केली याचा विश्लेषण आम्ही या सदरात यापूर्वी दिले होते ते विश्लेषण पुन्हा आपल्या वाचनासाठी या ठिकाणी देत आहोत. मांजर म्हातारी झाली म्हणून उंदीर तिला वाकुल्या दाखवीत नाही, या अर्थाची एक म्हण आहे. दुसऱ्या महायुद्धातील विनाशानंतर जगात अमेरिका आणि रशिया या दोन देशांचा महासत्ता म्हणून उदय झाला होता. त्यानंतर जगाने शांततेची कास धरली. मात्र, आज महासत्ता म्हणून रशिया उरला नाही. त्यामुळे, एकहाती जागतिक महासत्तेच बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेने उभे केलेले आणि आपल्या कौशल्याने ठिपक्या एवढ्या इस्त्राइल देशाला मुस्लिम राष्ट्रांच्या प्रांगणात नेऊन, लढायची मोकळीक देणाऱ्या अमेरिका आणि युरोपलाच आता इस्त्राइल धमकावयाला लागली आहे. पॅलिस्टिन जनतेला ठार करण्याचा परवानाच मिळवल्यागत इस्त्राइल वर्तन करित असून, गाझापट्टीच्या विनाशाच्या युध्दात आमच्या बाजूने उभे रहा, असं इस्त्राइल अमेरिका आणि युरोप ला धमकीच्या सुरात सांगत आहे. अर्थात, युध्दबंदी करण्यासाठी तुम्ही आग्रह तर करू नकाच पण, आम्ही करित असलेल्या पॅलिस्तिनींच्या विनाशाला विनाशर्त आणि सक्रिय साथ द्या, असं इस्त्राइल बजावत आहे. अर्थात, अलिकडे जगात जे युध्दखोर सत्ताधारी येत आहेत, त्यामागे, संबंधित देशाचे चिरकाल सत्ताधारी राहण्याची त्यांची मानसिकता आहे. इस्त्रायल चे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू याला अपवाद नाहीत. ज्या अमेरिका आणि युरोपने त्यांना तेलाच्या राजकारणासाठी अन्यायकारक पध्दतीने एक राष्ट्र म्हणून उभे केले, त्याच इस्त्राइल चे पंतप्रधान ही भूमिका घेत आहेत. वास्तविक, रशिया-युक्रेन प्रमाणेच इस्त्राइल-पॅलिस्टीन वादाचा गुंता निर्माण झाल्याचे युरोप-अमेरिकेच्या उशिरा लक्षात येत आहे. जगातील १०२ राष्ट्रांनी युध्दबंदी करण्यासाठी भूमिका घेतली, ही बाब युनोने घेतलेल्या मतदानातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे, आपण या युध्दात फरफटत जाऊ, हे युरोप-अमेरिकेच्या लक्षात आले आहे. दुसऱ्या बाजूला इस्त्राइल चे पंतप्रधान नेतान्याहू जुमानण्याच्या स्थितीत नाहीत. यामागचे कारण म्हणजे नेतान्याहू यांना इस्त्राइली जनतेचा प्रचंड विरोध आहे. इस्त्रायल च्या न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा त्यांचा प्रयत्न इतका अंगलट आला की, इस्त्रायली जनतेने त्यांचा राजीनामाच मागितला होता. यावरून लक्ष हटविण्यासाठी त्यांना हमास ने इस्त्राइल वर केलेल्या हल्ल्याचे आयते कोलीत मिळाले. त्यावरून असे वाटते की, हमास च्या अमेरिका धार्जिण्या किंवा हमासमध्ये घुसवलेल्या अमेरिका धार्जिण्या गटाने हा हल्ला चढवला का,की, ज्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांना बळ मिळाले! जो सत्ताधीश त्याच्या जनतेने दिलेल्या आव्हानातून मुक्त होऊ शकत नव्हता, त्याला इतक्या सहज जनतेच्या मनात स्थान मिळवून देणारे कृत्य हमासने का केले असावे, हा प्रश्न जगाने लक्षात घ्यायला हवा. यात जर काही तत्थ्य असेल तर जगाच्या राजकारणाचा एक भलताच अध्याय आपल्या समोर उभा ठाकला, असं समजायला प्रत्यवाय राहणार नाही. युक्रेन-रशिया युध्दात रशिया चीनच्या दिशेने जात असल्याने रशियाला अडथळा निर्माण करण्याची रणनीती आहे. परंतु, इस्त्राइल – पॅलिस्टिन हा लढा उभा राहिल्याने चीन-रशियाचे एकत्र येणे अधिक कडवे आव्हान निर्माण करणारं असल्याचे आता पश्चिमी देशांना लक्षात आले. या युध्दात आपली होरपळ होण्यापलिकडे अन्य काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे, इस्त्राइल ला युध्दबंदी करण्याचा आग्रह अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांनी चालवला आहे. परंतु, इस्त्राइल यास आता जुमानता दिसत नाही! याचा अर्थ मांजर आणि उंदीर यांना जे नैसर्गिकपणे कळत तितकं देखील इस्त्राइल ला कळण नाहीये, असा याचा अर्थ होतो. उंदीर तरूण असला तरी शक्तिहीन झालेल्या मांजरीला तो वाकुल्या दाखवीत नाही. तर, तिची जरब मान्य करतो. आज युरोप – अमेरिकेची जरब नेतान्याहू मान्य करताना दिसत नाहीत; याचा अर्थ ते विनाश्याकडे जात आहेत, असा याचा अर्थ मानावा का?
COMMENTS