Homeताज्या बातम्यादेश

इस्त्रायल-हिजबुल्लाहमध्ये युद्ध पेटले

300 हून अधिक क्षेपणास्त्र डागले ; 48 तासांसाठी आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली : लेबनानमधील अतिरेकी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला करत 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध प

शाळांमध्ये ’वाचन चळवळ’ राबवणार
येवल्यातील बोकटे येथील काल भैरवनाथ यात्रेला प्रारंभ |
पीक संरक्षण उत्पादनांचा सुरक्षीत वापर पिकांच्या व शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाचा : कुलगुरु डॉ.पाटील

नवी दिल्ली : लेबनानमधील अतिरेकी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला करत 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटले असून, इस्त्रायलने 48 तासांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर देत हल्ला चढवला आहे. इस्रायलच्या लष्कराने एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या हल्ल्याची माहिती दिली असून स्वसंरक्षणार्थ आम्ही हल्ला केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच लेबनानने आधी आमच्यावर 100 हून अधिक क्षेपणास्त्र डागले असा आरोपही इस्रायलने केला.

हिजबुल्लाहच्या या हल्ल्यापासून लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या इस्रायलच्या हद्दीत सायरनचे आवाज सतत ऐकू येत आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणी लागू केली आहे. तत्पूर्वी, रविवारी पहाटे इस्रायलने लेबनॉनच्या सीमेत घुसून हिजबुल्लाच्या ठाण्यांना लक्ष्य केले होते. यापूर्वी इस्त्रायलचे लष्कर लेबनानमधील इराण समर्थनार्थ संघटना हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला केला होता आणि तेथील 100 हून अधिक ठिकाणांवर निशाणा साधला होता. लेबनानच्या हवाई हल्ल्याचे उत्तर देताना हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हिज्बुल्लाहने इस्त्रालवर मोठा हल्ला केला. यावेळी हिज्बुल्लाहने तब्बल 300 हून अधिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. परिणामी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी पुढील 48 तासांसाठी इस्त्रायलमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. त्याशिवाय पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी उच्चस्तरित बैठक बोलावली. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि हिज्बुल्लाहमधील तणाव वाढत होता. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सॅवेट यांनी याबाबत सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे इस्त्रायल आणि लेबनॉनमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. इस्त्रायलच्या मुख्य लष्करी तळ, संरक्षक कवच डोम आणि इतर सैन्य स्थळावर हल्ला चढवल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. तर आम्ही केवळ दहशतवाद्यांच्या अड्डयांवर, ठिकाण्यांवर हल्ला चढवला. आम्ही रहिवाशी स्थळांना लक्ष्य केले नाही. पण हिजबुल्लाह सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे.

अमेरिका या हल्ल्यानंतर लक्ष ठेवून – या नवीन धुमश्‍चक्रीवर अमेरिका नजर ठेऊन आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे आपण समर्थन करत असल्याचे बायडेन यांनी सांगितले. त्याचवेळी या भागात शांतता नांदावी हा पण अमेरिकाचा प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS